ईश्वर महाजन यांची डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख पदी निवड!
अमळनेर प्रतिनिधी
डिजिटल मीडिया क्षेत्रात एक नवा अध्याय सुरु झाला आहे, कारण मराठी लाईव्ह न्युजचे मुख्य संपादक ईश्वर रामदास महाजन यांची डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्याच्या उत्तर महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून महाजन डिजिटल मीडिया क्षेत्रात कार्यरत आहेत, आणि त्यांच्या कार्याची दखल घेतली गेली आहे.
मुंबईतील सहविचार सभेत या निवडीची घोषणा डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी केली. महाजन ची निवड ही केवळ एक वैयक्तिक यशोगाथा नाही, तर डिजिटल मीडिया क्षेत्रामध्ये सामाजिक मूल्ये आणि जबाबदारी ठेवून काम करणाऱ्या सर्व घटकांचा संदर्भ घेणारी महत्त्वाची पायरी आहे.
या वर्षीच्या डिजीटल मीडियाच्या तिसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे आयोजन भोसले नॉलेज सिटी, सावंतवाडी, सिंधुदुर्ग येथे सहा एप्रिल रोजी करण्यात आले आहे. या अधिवेशनातून संघटनने डिजिटल मीडिया विकासाची दिशा स्पष्ट करणे आणि सामाजात जागरूकता निर्माण करणे या उद्देशाने कार्य करण्याची योजना आखली आहे.
महाजन यांच्या निवडीबद्दल मित्रपरिवाराच्या आणि मान्यवरांनी शुभेच्छा व अभिनंदन प्राप्त झाले आहे. दैनिक शब्दगंगाचे मुख्य संपादक देवेंद्र पाटील, दैनिक महाराष्ट्र सारथी चे मुख्य संपादक संदीप पाटील, सांज दैनिक दवंडीचे संपादक दिपक गवळे,सांज दैनिक युनायटेड खान्देशचे मुख्य संपादक नरेंद्र सोनवणे,देवगाव देवळी हायस्कूलचे अध्यक्ष विलासराव पाटील, व्हाईस ऑफ मीडियाचे प्रदेश सरचिटणीस ,जेष्ठ पत्रकार
डॉ. डिगंबर महाले, साप्ताहिक विंग चे
जिल्हाध्यक्ष संजय सूर्यवंशी, व्हॉइस ऑफ मिडीयाचे जिल्हा संघटक जयेश कुमार काटे, ज्येष्ठ पत्रकार धनंजय सोनार, उमेश धनराळे, व्हाईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष उमेश काटे, शहर अध्यक्ष जयवंतराव वानखेडे, साप्ताहिक विंगचे तालुका अध्यक्ष अजय भामरे व्हाईस ऑफ मीडिया व साप्ताहिक विंगचे तालुका व शहर, जिल्हा पदाधिकारी,शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.