• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

माजी विद्यार्थ्यी मेळावा* , *26 वर्षांनी विद्यार्थ्यांनी शाळेत येऊन जागवल्या शाळेतील भावना व विज्ञान प्रयोगशाळेला डिजीटल मायक्रोस्कोप भेट दिला*

Apr 26, 2025

Loading

*माजी विद्यार्थ्यी मेळावा*

*26 वर्षांनी विद्यार्थ्यांनी शाळेत येऊन जागवल्या शाळेतील भावना व विज्ञान प्रयोगशाळेला डिजीटल मायक्रोस्कोप भेट दिला*

ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालय जळगाव येथे १९९९ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला.सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. अशोक राणे शिक्षणशास्त्र महाविद्यालय जळगाव,शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री.दिलीपकुमार चौधरी ,माजी मुख्याध्यापिका सौ.वैजयंती तळेले, ज्येष्ठ शिक्षिका सौ.व्ही.एम.पाटील, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती प्रणिता झांबरे,पर्यवेक्षक पर्यवेक्षक श्री.नरेंद्र पालवे व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पहेलगाम येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना व नागरिकांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
मेळाव्याची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते गणेश पुजनाने करण्यात आली.माजी विद्यार्थ्यांना पेन आणि पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले.कार्यक्रमात प्राचार्य अशोक राणे यांनी माजी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत शाळेतून आपण जे संस्कार घेऊन समाजात सन्मानाने जगत आहोत हे विद्यालयाचे ऋणानुबंध कायम जोपासा.कार्यक्रमास प्रास्ताविकात श्रीमती प्रणिता झांबरे यांनी माजी विद्यार्थ्यांची देश विदेशात झालेली प्रगती व आठवणींना उजाळा दिला.
श्री.डी.व्ही.चौधरी व सौ.वैजयंती तळेले यांनी मनोगत व्यक्त व्यक्त केले.माजी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील गमती जमती किस्से सांगून आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या.व शाळेप्रती असलेला जिव्हाळा व्यक्त करत विद्यालयातील विज्ञान प्रयोग शाळेसाठी डिजीटल मायक्रोस्कोप भेट देऊन भविष्यात सुध्दा आम्ही शाळेतील विद्यार्थ्यांसाठी व शाळेसाठी सहकार्य करु अशा भावना व्यक्त केल्यात.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.चंद्रकांत कोळी,आभार प्रदर्शन श्री.नरेंद्र पालवे यांनी केले.मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व सर्व शिक्षक वव शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *