• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी राज्यपाल शौर्य पुरस्काराने ना, पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मानित

May 1, 2025

Loading

भडणे येथील पोलीस पाटील युवराज माळी राज्यपाल शौर्य पुरस्काराने ना, पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मानित

शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील पोलीस पाटील युवराज मोहन माळी यांनी गृह विभाग व महसूल विभागात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी व दाखवलेल्या धाडसाबद्दल प्रशासनास केलेली वेळोवेळी मदत शासकीय योजनांची माहिती व जनजागृती यांची प्रशासनाने दखल घेऊन राज्यपाल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले पावसाळ्यात भडणे येथील गावाबाहेरील नदीपात्रात रात्री दहा वाजता विखरण येथील दोन शेतकऱ्यांची युरिया तसेच डीएपी खताने भरलेली पीक गाडी गावाबाहेरील नदीपात्रात रात्री दहा वाजता नदीला मोठा पुर आला होता यावेळी पाण्याचा अंदाज न समजल्याने खताने भरलेली पीक गाडी पाण्यातुन काढत असताना नदीपात्रात जास्त पाणी असल्याने पाण्यात पलटी झाली सदर घटनेची माहिती पोलीस पाटील युवराज माळी यांना गावकऱ्यांनी दूरध्वनी द्वारे कळविले पाटील यांनी क्षणाचा विलंब न करता भर पावसात विजेच्या कडकडाटात थरारक अशा अंधारात त्यांनी रात्री दहा वाजता युवकांच्या मदतीने पोहता येत नसताना देखिल आपला जीव धोक्यात घालून पोलीस पाटील युवराज माळी यांनी दोर टाकून रात्रीच्या अंधारात ग्रामस्थांच्या मदतीने दोघं शेतकऱ्यांना नदीच्या पुरात पलटी झालेल्या गाडीत अडकलेल्या दोन शेतकऱ्यांना मृत्यूच्या दाढेतून पाण्यातून बाहेर काढून दोघांचे जिव वाचवले या दाखवलेल्या धाडसाबद्दल व अतुलनीय अशी कार्याची दखल प्रशासनाने घेत एक मे रोजी महाराष्ट्र दिनी धुळे येथील पोलीस कवायत मैदानावर धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज शिष्टाचार व पणन मंत्री यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांच्या वतीने अतुलनीय शौर्याचा सनमार्थ कार्याबद्दल शौर्य पुरस्कार या पुरस्काराचे स्वरूप प्रशस्तीपत्र ट्रॉफी तसेच पंचवीस हजारांचा धनादेश देऊन राज्यपाल शौर्य पुरस्कार देऊन पालकमंत्री यांच्या हस्ते गौरविण्यात आले यावेळी आमदार अनुप भैय्या अग्रवाल धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाणे धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर धुळे जिल्ह्य पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे उपजिल्हाधिकारी महेश शेलार पोलीस उपधीक्षक विश्वजीत जाधव व मान्यवर उपस्थित होते शिदखेडा पोलीस स्टेशनचे पी आय बाळासाहेब थोरात ए पी आय हनुमंत गायकवाड केदार राजा सूर्यवंशी व पोलीस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे गोरक्ष नेहे जिल्हा अध्यक्ष छोटूलाल पाटील संदेश पाटील किरण पाटील विनय माळी रवींद्र बेडसे महेंद्र पाटील राजेंद्र पाटील प्रकाश पाटील शिवाजी पाटील भूषण पाटील अड, दीपमाला पाटील पांडुरंग माळी किशोर माळी विशाल माळी भिला पाटील युवराज माळी प्रविण माळी आदींनी अभिनंदन केले
चौकट,,,,,,,,,,,,,,,,,
पुरस्काराचे श्रेय माझे भडणे गावकरी,,,,,,,,,,,,,,,
महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा राज्यपाल शौर्य पुरस्कारांचे खरे श्रेय माझ्या गावकऱ्यांना देतो कारण त्यांनी मला वेळोवेळी दिलेली साथ केलेल मार्गदर्शन वाढवलेला आत्मविश्वास संपूर्ण गावाचे सहकार्य शांतता एकजूट एक उत्सव यासाठी दिलेल् गावांने योगदान यामुळेच मला माझ्या कार्याची दखल घेत शासनाने राज्यपाल शौर्य पुरस्काराने सन्मानित केल्याने , समाधान वाटले,
युवराज माळी राज्यपाल शौर्य पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील भडणे,,,,,,,,,,,,,,,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed