• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

मातृसत्ताक जीवनप्रणाली कौटुंबिक जीवनमूल्ये व समाजोन्नतीचा पाया आहे ‘ : सोपान भवरे*

May 17, 2025

Loading

*’ मातृसत्ताक जीवनप्रणाली कौटुंबिक जीवनमूल्ये व समाजोन्नतीचा पाया आहे ‘ : सोपान भवरे*

जळगांव प्रतिनिधी

‘ मातृसत्ताक जीवनप्रणाली कौटुंबिक जीवनमूल्ये व समाजोन्नतीचा पाया आहे ‘ असे प्रतिपादन ‘लेखनमंच ‘ साप्ताहिकाचे उपसंपादक तथा माध्यमिक शिक्षक सोपान भवरे यांनी केले.भारतरत्न डॉ.एपीजे अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव आयोजित मातृदिनानिमित्त रविवार दि.११ मे २०२५ रोजी आदर्श मातांचा अनौपचारिक सत्कार कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना भवरे बोलत होते.कार्यक्रमाचे आयोजन पुस्तक भिशीचे संस्थापक जिल्हाप्रमुख विजय लुल्हे यांनी केले होते.

 

 

 

 

पुढील मार्गदर्शनात भवरे म्हणाले की, ‘ आपली मूळ संस्कृती ही सिंधू संस्कृती असून त्यात जातीभेद , वर्णभेद व उच्चनीचता भेदभाव नव्हता.समतेचा पुरस्कार सिंधू संस्कृतीने केला मात्र आर्यांनी आपली संस्कृती भ्रष्ट केली.आदर्श माता जिजाऊ यांनी शिवरायांना घडवलं तसेच ताराराणी यांनी आपल्या हयातीत औरंगजेबाला जिंकूच दिलं नाही.गौतम बुद्धांनी भारताला समतेचं तत्त्वज्ञान तसेच वैज्ञानिक दृष्टिकोन दिला.ब्राह्मणी कुटील प्रवृत्तीने बहुजनांचे तत्त्वज्ञान उपेक्षित ठेवून काल्पनिक तत्त्वज्ञानाचा पाया रचला व पोट भरण्यासाठी बहुजनांना कर्मकांड व परंपरेत अडकवून त्यांचा पिढयानुपिढया विकास खुंटवला. मात्र त्यांच्या पोरांना त्यांनी अभ्यासाला लावून उच्चपदस्थ केले ! शनिशिंगणापूर ,शिर्डी तिरुपती येथील देवस्थाने कर्मकांडांचा बाजार करून श्रीमंतांचे चोचले पुरवताहेत आणि बहुजनांचा हक्क हिरावून घेत आहेत ! एवढेच नव्हे तर बहुजनांचे अस्सल मूळ सण यामध्ये पोथी पुराणात सहेतूक अंधश्रद्धा घुसळवल्याचे महापाप ब्राह्मणांनी केले.बळीराजा आणि खंडेराव यांचे समाजोत्थानाचे व सांस्कृतिक महत्त्वही भवरेंनी अधोरेखित केले.
[ अनौपचारिक सत्काराचे वैशिष्ट्य : – पूर्व सूचना न देता आदर्श मातांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन अनपेक्षित सत्कार करण्यात आला. मातांचे सन्मानपूर्वक औक्षणा नंतर शाल,श्रीफळ देऊन भावपूर्ण सत्कार करून आशिर्वाद घेतले. विशेषतः सत्कारापूर्वी त्यांचे सुपुत्र व सुकन्या यांना अग्रपूजेचा व शुभाशिर्वाद घेण्याचा जन्मजात हक्क देण्यात आला ! ]
———————————–
*समानार्थी आदर्श माता व त्यांचा सन्मान करणारे मान्यवर*
१ ] श्रीमती कमल निळकंठ महाजन – सत्कार हस्ते : श्रीमती अरुणा देवरे
२ ] सौ.कुसूम शंकर दांडगे : अग्रपूजन – सुकन्या वसुंधरा, सत्कार हस्ते : पत्रकार सोपान भवरे
३ ] सौ.वसुंधरा सोपान भवरे,अग्रपूजन – चि.मानस , सत्कार हस्ते : आदर्श शिक्षक भास्कर वानखेडे
४ ] श्रीमती विजया आबासाहेब सोनार : अग्रपूजन – सुकन्या श्रीमती वर्षा अहिरराव , सुपूत्र प्रसाद सोनार , सत्कार हस्ते : आदर्श शिक्षक भास्कर वानखेडे
५ ] सौ.कावेरी विजयराव रूम [ माजी संपादिका, साप्ताहिक विश्वकर्मा समाचार ]
अग्रपूजन – सुकन्या वैशाली सपकाळे, सत्कार हस्ते : पत्रकार सोपान भवरे
६ ] सौ.वैशाली सपकाळे,अग्रपूजन – चिरंजीव रोहन व सुकन्या कोमल
सत्कार हस्ते : पत्रकार सोपान भवरे
७ ] सौ.प्रतिमा चव्हाण ( निवृत्त मुख्याध्यापिका ) ,अग्रपूजन – सुकन्या सौ. तारकेश्वरी भामरे ,सौ.लीना सोनवणे, सौ.भावना सुर्वे – सत्कार हस्ते : माध्यमिक शिक्षक सोपान भवरे
८ ] श्रीमती सिंधू सुपडू सुतार :- अग्रपूजन व सत्कार हस्ते – चिरंजीव विजय लुल्हे
———————————–
कार्यक्रमास कु.तेजल महाजन ( कॉम्प्युटर इंजिनिअर ), निवृत्त शिक्षक शंकर दांडगे , निवृत्त अभियंता तथा लेखक विजयराव रूम ,ज्येष्ठ साहित्यिक भास्करराव चव्हाण ( निवृत्त केंद्रप्रमुख धरणगाव ) आणि आप्तेष्ट उपस्थित होते.याप्रसंगी लेखक विजयराव रुम यांनी स्वलिखित पुरस्कृत प्रकाशित पुस्तके देऊन पत्रकार सोपान भवरे यांचा सत्कार केला. संयोजक विजय लुल्हे ऋणनिर्देश व्यक्त केले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *