
*’खेलो इंडिया युथ गेम्स’ स्पर्धेत महाराष्ट्राची दमदार कामगिरी… उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले सर्व विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन*
मुंबई : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेतून सुरु झालेल्या “खेलो इंडिया युथ गेम्स” स्पर्धेत महाराष्ट्राने दमदार कामगिरी केली आहे . 58 सुवर्ण, 47 रौप्य व 53 कांस्य अशा एकूण 158 पदकांसह महाराष्ट्राने पदक तालिकेत अव्वल स्थान मिळवले आहे. केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खेडसे यांच्या हस्ते महाराष्ट्राला विजेतेपदाचा करंडक देऊन गौरवण्यात आलं. समारोप सोहळा पाटलीपुत्र स्टेडियममध्ये झाला. या सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन केले.
“खेलो इंडिया युथ गेम्स” स्पर्धेत 58 सुवर्ण, 47 रौप्य व 53 कांस्य अशा एकूण 158 पदकांसह महाराष्ट्राने पदक मिळवले आहेत. या खेळाडूंना ऑलिम्पिक स्पर्धेत संधी मिळो, अशी सदिच्छा चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. .
बिहारमध्ये झालेल्या सातव्या खेलो इंडिया युवा स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी गुरुवारी महाराष्ट्राने १५८ पदकांसह अव्वल स्थान पटकावताना जेतेपदांची हॅटट्रिक पूर्ण केली. महाराष्ट्रातील खेळाडूंनी ५८ सुवर्णपदके, ४७ रौप्य आणि ५३ कांस्यपदके जिंकली.हरियाणा ३९ दुसऱ्या तर राजस्थान २४ सुवर्णपदकांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर राहिले. तर कर्नाटक १७ आणि दिल्ली १६ सुवर्णपदकांसह अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर राहिले. स्पर्धेतील २७ पैकी २२ क्रीडा प्रकारांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. अॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक १० सुवर्णपदकांना गवसणी घातली, तर जलतरणात ७ सुवर्ण पदकांसह २९ पदकं कमवली. जिम्नॅस्टिक्समध्ये ६, धनुर्विद्येत ६, भारोत्तोलनात ५ सुवर्णपदके महाराष्ट्राने पटकावली.