
जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ यांना संसद रत्न पुरस्कार; अमळनेर येथे भाजपद्वारे आनंद उत्सव
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन) – जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम आणि सर्वदरप्रिय खासदार स्मिताताई वाघ यांना नुकताच संसद रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला असून या ऐतिहासिक यशाबद्दल त्यांचे सर्वत्र मोठ्या प्रमाणावर अभिनंदन होत आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून स्मिताताई यांच्या कर्तृत्वाचे कौतुक करण्यात येत आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सन्मान स्मिताताई वाघ यांना दिला गेला आहे. याप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पक्षाचे वरिष्ठ मंत्री गिरीश महाजन यांनीही त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव केला आणि त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
जळगाव जिल्हयात या सन्मानाचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अमळनेर येथे भाजप पक्षाकडून विशेष आनंद उत्सव संपन्न झाला, जिथे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी खासदार स्मिताताई यांना अभिनंदन करून त्यांच्या यशावर आनंद व्यक्त केला.
भाजपमध्ये असतानाही स्मिताताई वाघ यांचे सर्व राजकीय पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांशी सौजन्यपूर्ण संबंध असून हे मैत्रीचे उदाहरण आहे. या गुणांमुळे त्यांना सर्व स्तरांवरून मान्यता आणि सन्मान मिळत असून त्यांच्या कार्यामुळे जळगाव जिल्ह्याचा गौरव वाढला आहे, असे कार्यकर्ते सांगत आहेत.
स्मिताताई यांच्या नेतृत्वाखाली जळगाव लोकसभा मतदारसंघात अनेक विकासकामे, सामाजिक उपक्रम आणि शैक्षणिक वाढ यांना चालना मिळाली आहे. त्यांच्या जिद्दीने आणि समर्पणाने या पात्रतेपेक्षा अनेक पटीने जास्त कार्य केले असून, संसद रत्न पुरस्काराने त्यांच्या कार्याची पावती मिळाली आहे.
या सन्मानानं जळगाव जिल्ह्यातील राजकीय व सामाजिक व्यावसायिक वातावरणात नवीन ऊर्जा आणि उत्साह निर्माण झाला असून, स्थानिक जनतेमध्ये त्यांच्या कार्याबद्दल अपार अभिमान पाहायला मिळत आहे.
–