• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

**जळगाव जिल्ह्यात शिक्षक समस्या निराकरण सभेचे भव्य आयोजन!**

May 24, 2025

Loading

*✒️माध्यमिक शिक्षक तक्रार निवारण सभा*

दि. 26/5/2025 वेळ -स.11वा.
स्थळ- पंचायत समिती सभागृह एरंडोल

(एरंडोल, धरणगाव, पारोळा व भडगाव तालुका संयुक्त सभा)
………………………………………

जळगाव जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शिक्षक बंधू भगिनींना सुचित करण्यात येते की नाशिक विभागाचे शिक्षक आमदार आदरणीय किशोर भाऊ दराडे यांच्या मार्गदर्शनातून शिक्षक समस्या निराकरण सभांचे आयोजन करण्यात येत आहे. शिक्षकांचे व शाळांचे प्रलंबित प्रश्न त्वरेने सुटावेत म्हणून सदर सभांचे आयोजन संपूर्ण जिल्हाभर केले जाणार आहे. धरणगाव, एरंडोल, पारोळा व भडगाव या चार तालुक्यांची संयुक्त सभा 26 मे 2025 रोजी पंचायत समिती सभागृह, एरंडोल या ठिकाणी सकाळी 11.00 वा. म. शिक्षणाधिकारी सो., माध्यमिक, जि.प. जळगाव यांचे उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. धरणगाव, एरंडोल, भडगाव व पारोळा या चार तालुक्यातील शिक्षकांच्या ज्या समस्या असतील त्या आदरणीय शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांच्या नावे अर्ज स्वरूपातून सोबत आणावेत, असे आवाहन करण्यात येत आहे. सदर सभेस त्या-त्या तालुक्याचे संपर्कप्रमुख उपस्थित राहणार आहेत. अशा स्वरूपात तक्रार निवारण सभा सर्व तालुक्यांमध्ये संपन्न होणार असल्याने वरील चार तालुक्यांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही तालुक्यातील शिक्षकांनी आपले अर्ज आणू नये असे आवाहन करण्यात येत आहे. शिक्षकांचे प्रश्न तातडीने सुटावेत, अशा पद्धतीची भूमिका माननीय शिक्षक आमदार किशोरभाऊ दराडे यांनी घेतली आहे. त्या अनुषंगाने शिक्षण विभागाकडे पाठपुरावा केला जाणार आहे.

*-आपले विनीत-*
*भरत शिरसाठ *डाॅ. मिलिंद बागुल
(प्रदेशाध्यक्ष (मार्गदर्शक, समन्वय समिती)
समता शि.परिषद)
*रावसाहेब जगताप, प्र.उपाध्यक्ष, सशिप
*श्री. नारायण वाघ, अध्यक्ष, समन्वय समिती
*श्री. तुळशीराम सोनवणे, समन्वयक, समन्वय समिती
*श्री.रणजित सोनवणे, जिल्हाध्यक्ष,समता शि.परिषद
श्री. संदिप घुगे, संचालक, माध्यमिक पतपेढी जळगाव
*प्रशांत नरवाडे, जिल्हाध्यक्ष इस्तु संघटना
*प्रविण केदार, जिल्हा उपाध्यक्ष, सशिप
*भैय्यासाहेब सोनवणे, विभागीय सचिव, सशिप.
*श्री सुधाकर मोरे, जिल्हा सहसचिव,सशिप
*प्रकाश तामस्वरे, तालुकाध्यक्ष, एरंडोल, सशिप

*सर्व सदस्य, शिक्षक समस्या निवारण समिती*
संपर्क- 7387632583
टिप- आपले वाहन एरंडोल पंचायत समिती कार्यालयीन आवारामध्ये पार्क करू नये. अन्य ठिकाणी पार्क करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *