• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

मुहम्मद (स.अ.सल्लम) यांच्याविरुद्ध अपमानास्पद वक्तव्यावर मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध, शर्मिष्ठांविरुद्ध कायदेशीर कारवाईची उपविभागीय अधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी

May 24, 2025

Loading

मुहम्मद (स.अ.सल्लम) यांच्याविरुद्ध अपमानास्पद वक्तव्यावर मुस्लिम समाजाकडून तीव्र निषेध, शर्मिष्ठांविरुद्ध कायदेशीर कारवाईची उपविभागीय अधिकारी यांच्या कडे निवेदनाद्वारे मागणी

अमळनेर प्रतिनिधी
अंतिम प्रेषित मुहम्मद (सल्लम) यांच्या बद्दल पी.आर. शर्मिष्ठा यांनी केलेल्या अपमानकारक वक्तव्यावर अमळनेर मुस्लिम समाजाने कठोर निषेध व्यक्त केला आहे. अशा वक्तव्यांमुळे केवळ धार्मिक भावना दुखावल्या जात नाहीत, तर समाजात द्वेष, तणाव आणि अस्थिरतेचा उदय होण्याची भीती आहे.
मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आलेल्या या निवेदनात नुकत्याच पुणे सिम्बायोसिस कॉलेजची विधार्थिनी पी.आर. शर्मिष्ठा यांनी कायदेची भाषा समजूनही अशा प्रकारच्या अभद्र विधानांचा उपयोग केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी पावले उचलण्याची गरज असल्याचे नमूद केले आहे.
अमळनेरचे अतिरिक्त प्रांत अधिकारी नितीन कुमार मुंडावर साहेब यांच्या मार्फत हा निवेदन माननीय राष्ट्रपती, भारताचे पंतप्रधान तसेच गृहमंत्र्यांसमोर सादर करण्यात आले आहे. शासन प्रशासनाकडे याबाबत योग्य ती तीव्र कार्यवाही होईल, तसेच धार्मिक सलोखा कायम ठेवण्यास हातभार लागेल, असा समाजाचा विश्वास आहे.

**धार्मिक सलोखा आणि शांततेचा संदेश**
मुस्लिम समाजाने सर्वांना परस्पर आदर आणि धार्मिक सलोखा वृद्धिंगत करण्यासाठी आवाहन केले आहे. समाजात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व वर्गांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.
या वेळी प्रांत अधिकारी नितीन कुमार मुंडावर साहेबांना मौलाना रियाज शेख यांनी निवेदन सार्वजनिकपणे वाचून दाखवले. त्यांनी मुस्लिम समाजातील संताप व्यक्त करत पी.आर. शर्मिष्ठा यांच्याविरुद्ध त्वरित कारवाई करण्याची मागणी केली.
या वेळी मौलाना रियाज शेख, इकबाल कुरेशी, अल्तमश शेख, आकिब अली, इमरान भाया, शाहरुख सिंगर, मोहसिन जडीबुटी, हाफिज़ तौसीफ, इमरान शेख, हाजी कादर जनाब, फैजान शेख, रिज़वान मनियार, अफजान शेख यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

**मुस्लिम समाजाचा निर्धार:** धार्मिक भावना आणि समाजिक सौहार्दासाठी कोणत्याही प्रकारच्या द्वेषाच्या प्रकटीकरणाला समाज कायमस्वरूपी रोखेल आणि न्यायासाठी निर्धारपूर्वक पुढे राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed