• Sun. Jun 15th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

उल्हास नदीकिनारी बेवारस मृत इसमाचे प्रेत आढळले.* *खडकपाडा पोलीस स्टेशन तर्फे मयताचे ओळख पटवण्याचे आवाहन.*

Jun 8, 2025

Loading

*उल्हास नदीकिनारी बेवारस मृत इसमाचे प्रेत आढळले.*

*खडकपाडा पोलीस स्टेशन तर्फे मयताचे ओळख पटवण्याचे आवाहन.*

कल्याण( मनिलाल शिंपी)खडकपाडा पोलीस ठाणे अपमृत नोंद क्रमांक 78 / 2025 कलम 194 बी एन एस एस प्रमाणे दिनांक 3/6/ 2025 रोजी दाखल असून यातील अनोळखी मयत पुरुष असून त्याचे वय अंदाजे 45ते 50 वर्षेआहे थोडक्यात हकीकत अशी खडकपाडा पोलीस ठाणे कल्याण पश्चिम येथे वर नमूद प्रमाणे अपमृत्यू नोंद असून त्यातील अनोळखी मयत इसम वय अंदाजे 45 ते 50 वर्ष हा उल्हास नदीच्या किनारी पूर्वेकडील बाजूस गणेश घाट वडवलीगाव आंबिवली या ठिकाणी नदीच्या वाहत्या पाण्यात मिळून आल्याने त्यास उपचाराकरता बाई रुक्मिणीबाई हॉस्पिटल कल्याण पश्चिम येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी त्यास दाखल पूर्व मयत घोषित केले आहे सदर मयतावर पीएम झाले असून मयताचे कोणीही वारस मिळून न आल्याने सदरचे प्रेत शीतगृहात ठेवलेले आहे तरी यातील मयत यांच्या नातेवाईकाचा शोध घेण्या कामी संबंधित मयत व्यक्तीची माहिती नातेवाईकांना द्यावी असे खडकपाडा पोलिस स्टेशनतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed