• Sun. Jun 15th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

रोटरी क्लब अमळनेरच्या RYLA 2025 मध्ये 135 विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकासाचा प्रवास “जिवन शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी रोटरी क्लब अमळनेरचे यशस्वी नेतृत्व शिबिर”

Jun 9, 2025

Loading

रोटरी क्लब अमळनेरच्या RYLA 2025 मध्ये 135 विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकासाचा प्रवास

“जिवन शिक्षण आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी रोटरी क्लब अमळनेरचे यशस्वी नेतृत्व शिबिर”

अमळनेर प्रतिनिधी
रोटरी क्लब अमळनेर आयोजीत ROTARY YOUTH LEADERSHIP AWARDS (RYLA) दि 8-6-2025 रविवार रोजी रोटरी हाॅल येथे आयोजीत करण्यात आला यात मुलांना “व्याक्तीमत्व विकास व जिवन शिक्षण” या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी साधन व्यक्ती म्हणून नासिक चे ख्यातनाम प्रा.ललित खैरनार हे आले होते. या कार्यशाळेसाठी अमळनेर येथील 10 वीच्या वर्गातील मुली व मुलांनी असे 135 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवुन व्याक्तीमत्व विकास व जिवन शिक्षणावर सहभाग पध्दतीने व बौद्धिक खेळातून जिवन शिक्षणाचे धडे गिरवले. जसे “कुछ पाने केलीये, कुछ ज्यादा करना पडता है”.
विषेश या कार्यशाळेत सहभागी प्रत्येक विद्यार्थ्यांस रोटरी क्लब अमळनेर व रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 च्या संयुक्त प्रोजेक्ट ज्यात IDEAL STUDY Mumbai मार्फत तयार केलेले 10 वी अभ्यासक्रमाची आधारीत STUDY BUDDY APP (Mobile App) ज्याची बाजार मुल्या रू 1500/- आहे ते स्वागत मुल्य रू 15/- मिळणार आहे.
रोटरी क्लब अमळनेर मागील सलग पाच वर्षापासुन हि कार्यशाळा घेत आहे. रोटरी ईन्टरनॅशनल युवकांवर रायला (RYLA) च्या माध्यमातून त्यांचा विकास घडवून सुजाण नागरिक घडवण्याचे काम करत असते.
आजच्या रायला उदघाटन श्री.प्रदिप अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले, प्रमुख पाहुणे रो.मितेश गोसलीया व रो.लालचंद सैनानी यांनी जिवन शिक्षण किती महत्वाचे आहे हे त्याच्या भाषणातुन समजावून सांगीतले. कार्यक्रमाचे सुत्र संचलन रो. प्रतिक जैन व रो.किर्तीकुमार कोठारी यांनी केले.
समारोप प्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांनी शिबिराबाबत मनोगत व्यक्त केली व रोटरी क्लब अमळनेर चे आभार मानले.
प्रेसिंडेंट रो.ताहा बुकवाला यांनी सर्वांचे आभार मानले. या वेळी रोटरीचे रो.विशाल शर्मा – सेक्रेटरी, रो.रोहीत सिंघवी, रो. अविनाश अमृतकर या कार्यक्रमाच्या नियोजनात सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed