स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात श्रीमंत छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महाकवी कालिदास,बालगंधर्व जयंती साजरी.
जळगांव: येथील खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव येथे थोर समाजसुधारक, स्त्री शिक्षण, विधवा पुनर्विवाहचे पुरस्कर्ते,आरक्षण व्यवस्थेचे जनक श्रीमंत छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची 151वी जयंती ”सामाजिक न्याय दिन ” म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सदर प्रसंगी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पर्यवेक्षक प्रा.आर.बी.ठाकरे यांच्या शुभहस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी भारतीय समाज व्यवस्थेत छत्रपती शाहू महाराजांचे अनन्यसाधारण योगदान, जलसंधारण, प्राथमिक शिक्षण, सामान्य जनता, बहुजन वर्गासाठी केलेले कार्य याविषयी उपस्थितांना अवगत केले. प्रा.गणेश सूर्यवंशी यांनी छत्रपती शाहू महाराज हे लौकिकार्थाने रयतेचे राजे होते हे विशद करतांना बहुजन समाजाला स्वाभिमानाच नवं जीवन देणारे लोकराजे छत्रपती शाहू महाराजांनी केलेले अनेक लोकहितार्थ उपक्रम आजही समाज व्यवस्थेस किती उपयुक्त आहेत, त्या काळात त्यांनी मांडलेले समाजसुधारणेचे विचार आजही किती समर्पक आहेत याविषयी प्रतिपादन केले.
यावेळी संस्कृत भाषेतील महाकवी कालिदास, बालगंधर्व यांची जयंती देखील साजरी करण्यात आली.प्रा.ईशा वडोदकर यांनी महाकवी कालिदास आणि मराठी रंगभूमीवरील प्रख्यात कलावंत बालगंधर्व यांच्या जीवनकार्याविषयी उपस्थित शिक्षकांना माहिती दिली.
याप्रसंगी विज्ञान शाखा, कला आणि वाणिज्य शाखा समन्वयक प्रा.स्वाती बऱ्हाटे, प्रा.उमेश पाटील, सांस्कृतिक समिती प्रमुख प्रा.संदीप वानखेडे यांचेसह सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.