साने गुरुजी वाचनालयात राजश्री शाहू महाराज जयंती निमित्ताने अभिवादन
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयात राजश्री शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी साने गुरुजी वाचनालयाचे चिटणीस अण्णासाहेब प्रकाश वाघ यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले.. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी वाचनालयाचे संयुक्तचिटणीस सुमित धाडकर होते..
यावेळी साने गुरुजी वाचनालयाचे वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाचनालयाचे कर्मचारी मधुकर बाळापुरे यांनी प्रयत्न केले