• Mon. Jul 7th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

आपल्या महापुरुषांनी दिलेल्या पुरोगामी विचारांनीच देशाचा विकास -रियाज भाई मौलाना

Jun 27, 2025

Loading

आपल्या महापुरुषांनी दिलेल्या पुरोगामी विचारांनीच देशाचा विकास
-रियाज भाई मौलाना

अमळनेर प्रतिनिधी
आपल्या देशाची एकता अखंडित राहण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे.तसेच देशात जातीय व धर्मांध शक्ती संविधानाच्या विरुद्ध कृती करीत आहेत. जाती व धर्माबाबत द्वेष निर्माण करीत आहेत, यामुळे देशाची एकात्मता भंग होण्याचा धोका निर्माण झाला आहे, आपल्या महापुरुषांनी दिलेल्या समतेच्या व समानतेच्या पुरोगामी विचारांनीच देशाचा विकास होईल असे प्रतिपादन अल्लामा फजले( हक) खैराबादी पब्लिक लायब्ररीचे अध्यक्ष रियाज भाई मौलाना यांनी केले,सदर कार्यक्रमात मान्यवरांच्या सत्कार प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. अशोक पवार अध्यक्ष, युवा कल्याण प्रतिष्ठान अमळनेर हे होते.
पत्रकार डॉ. समाधान मैराळे यांना डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल तसेच सर डी एम पाटील,(तालुका अध्यक्ष )प्रशांत निकम(शहर अध्यक्ष), जाकीर शेख, (शहर कार्य अध्यक्ष )शरीफ शेख (शहर उपाध्यक्ष,)हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे पदाधिकारी झाल्याबद्दल त्यांच्या सत्कार समारंभासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होते .याप्रसंगी बन्सीलाल भागवत, मनोहर नाना व सर्व सत्कारार्थीनी मनोगत व्यक्त केले, याप्रसंगी राष्ट्रवादीचे शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष दयाराम पाटील ,उपाध्यक्ष संजय पाटील, प्रा.विजय गाडे सर, सामाजिक कार्यकर्ता मनोज मोरे,नूर भाई, सुरेश कांबळे प्रवीन बैसाने, आत्माराम आहिरे,जहुर मुतवल्ली मुख्तार मिस्री, हैदर मिस्री,अ.गफ्फार खाटीक,आप्पा दाभाडे, गोरख महाराज, प्रभाकर पारधी, युसूफ पेंटर,फारुख खाटीक,आरीफ शेख, मुन्ना शेख, परवेज बागवान, आदि पत्रकार उपस्थित होते………………………….
,……….. सदर कार्यक्रमात अमळनेरातील प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते .श्री.भरत बोरसे यांनी उत्कृष्ट सूत्रसंचालन केले.आभार प्रदर्शन डि,ए, पाटील सर यांनी केले, कार्यक्रमाचे आयोजन अल्लामा फजले (हक) खैराबादी स्टडी सेंटर व पब्लिक लायब्ररीच्या वतीने करण्यात आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *