“राजर्षी शाहु महाराज जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साने गुरुजी विद्यालयात साजरी.”
अमळनेर प्रतिनिधी
साने गुरुजी कन्या हायस्कूल व साने गुरुजी नुतन माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहु महाराज जयंती सामाजिक न्याय दिन म्हणुन साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री आप्पासाहेब गुणवंतराव गुलाबराव पाटील हे होते . व्यासपिठावर प्रमुख वक्ते महिला महविद्यालयअमळनेर चे प्राध्यापक श्री. सुनिल वाघमारे उपस्थित होते, व्यासपीठावर जेष्ठ संचालक आप्पासाहेब गुणवंतराव पाटील, आबासाहेब श्री. भास्कर बोरसे, मा. श्री. नानासाहेब. अशोक बावीस्कर, दादासाहेब. श्री. किरण पाटील साने गुरुजी नुतन माध्य विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुनिल पाटील सर व साने गुरुजी कन्या हायस्कूलच्या मुख्याध्यापिका माननीय श्रीमती अनिता बोरसे मॅडम या उपस्थित होत्या . मान्यवरांनी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन माल्यार्पण केले. प्रमुख वक्ते श्री. सुनिल वाघमारे यांनी राजर्षी शाहू महाराज व त्यांची शैक्षणिक चळवळ, सामाजिक चळवळीचे अनेक प्रसंग सांगितले व त्यांना रयतेचे राजा का म्हटले जात होते ते सांगितले.
मुख्याध्यापक श्री. सुनील पाटील सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व त्यांनी शाहु महाराजांचे जीवन कार्य सांगितले. आपल्या भाषणात मुख्याध्यापिका श्रीमती अनिता बोरसे मॅडम यांनी शाहु महाराज यांना राजर्षी का म्हटले जात होते, त्यांनी शेतकरी हिताची कोणती कार्य केली. विद्यार्थी शिक्षणासाठी कोणती कार्य केली. ह्या सगळ्या गोष्टी आपल्या भाषणात मांडल्या. सूत्रसंचालन श्री. मुकेश पाटील व श्री. विलास चौधरी व आभार श्री. जे. एस. पाटील यांनी केले.