*आश्रमशाळा पिंपळे येथे वृक्ष लागवडीसाठी दोन वाजून दोन मिनिटांचा साधला मुहूर्त*
अमळनेर तालुक्यातील पिंपळे बु.येथील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आदिवासी आश्रम शाळेत पर्यावरण संरक्षण व रक्षण करणे ही आजच्या काळाची गरज आहे, ही गरज ओळखून आश्रम शाळेत पर्यावरण प्रेमी मुख्याध्यापक श्री उदय पाटील व श्री अविनाश अहिरे सर यांच्या संकल्पनेतून आज दोन वाजून दोन मिनिटांनी जपान मधील मियावाकी पद्धतीने विविध प्रकारच्या 202 झाडांची लागवड 202 विद्यार्थ्यांनी केली व ती झाडे दत्तक घेतली, जपानमध्ये अवलंबल्या जाणाऱ्या या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांप्रमाणेच झाडांमध्ये देखील स्पर्धा लागते व झाडे जोमाने वाढू लागतात यावेळी पर्यावरण संरक्षणाची शपथही घेण्यात आली, असा अनोखा उपक्रम सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामार्फत राबवण्यात आला, सदर उपक्रमाचे यावल प्रकल्प अधिकारी माननीय श्री अरुण पवार साहेब, सहायक प्रकल्पाधिकारी श्री पवन कुमार पाटील, श्री चिंतामणी महिला एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे अध्यक्षा सौ विद्याताई पाटील, सचिव श्री युवराज पाटील, ऍडव्होकेट अभिजीत पाटील, सर्व संचालक मंडळ यांनी कौतुक केले व पुढील नवनवीन उपक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या