अमळनेर येथे स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपक्रम*
अमळनेर प्रतिनिधी: अमळनेर नगरपरिषदेत मुख्याधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी संयुक्त उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत स्वच्छ महाराष्ट्र अभियान- स्वच्छ सर्वेक्षण २०२५, अमळनेर नगर परिषद – स्वच्छता विभाग व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान, अमळनेर तसेच सफाई अपनावो बिमारी भगावो अभियान अंतर्गत महिला बचत गट मेळावा, यांचे यशस्वी आयोजन इंदिरा गांधी भवन मध्ये करण्यात आले.
मुख्याधिकारी तुषार नेरकर यांचे मार्गदर्शनाखाली सदर मेळावा आयोजित करण्यात आला होता. सदर मेळावा प्रसंगी कुशाग्र फाऊंडेशन मार्फत घनकचरा व्यवस्थापन, कचरा विलगीकरण , संकलन व प्रक्रिया तसेच घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत उपलब्ध विविध व्यवसायाच्या / उद्योग धंदे यांच्या संधी याबद्दल सखोल मार्गदर्शन करण्यात आले. सदर प्रसंगी मुकेश चव्हाण व श्री. देवेंद्र केळोदे यांचे मार्फत उपस्थित बचत गट महिलांना माहिती देण्यात आली. कार्यक्रमास एकूण ५० महिला , स्वच्छता विभागातील व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान चे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यात प्रामुख्याने अमळनेर शहरातील महिला बचत गटातील महिला सदस्य, तसेच स्वच्छता निरीक्षक संतोष बि-हाडे स्वच्छता निरीक्षक किरण कंडारे, सह राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान चे समन्वयक चंद्रकांत मुसळे, स्वच्छ भारत अभियान शहर समन्वयक गणेश गढरी, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कर्मचारी तुकाराम भोई, उज्ज्वला पाटील, स्वच्छता विभाग कर्मचारी योगेश पवार, सतीश बिऱ्हाडे, शाम करंदीकर, अनंत संदानशिव, जया सरदार, समाधान बच्छाव , युनुस शेख ई. आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रम अखेरीस उपस्थित सर्वांना स्वच्छता व हरित शपथ देण्यात आली. तसेच कापडी पिशवीचे वाटप करून कापडी पिशवीचा दैनदिन दिवसात वापर करण्याचे व प्लास्टीकचा वापर टाळण्याचे सांगण्यात आले,