आमदार अनिल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामिण भागातही रक्तदानाची चळवळ
बाम्हणे येथे रक्तदान शिबिरात ५०+ युनिट रक्त संकलित
अमळनेर – माणुसकीचा खरा धर्म जोपासत आणि समाजसेवेचा वारसा पुढे नेत, महाराष्ट्र राज्याचे माजी मदत व पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री, तसेच अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त साधत शहरापाठोपाठ ग्रामिण भागातही रक्तचळवळ सुरू झाली असून बाम्हणे (ता. अमळनेर) येथे आयोजित रक्तदान शिबिरास युवांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
एकाच गावातून ५० पेक्षा जास्त युनिट बॅग रक्त संकलित करून मानवतेचे एक सुंदर उदाहरण साकारले गेले.ही चळवळ इतर गावातही राबविण्याचा मानस आयोजकांनी यावेळी व्यक्त केला.सदर रक्तदान शिबिराचे आयोजन जीवनश्री ब्लड सेंटर, अमळनेर आणि जीवनज्योती ब्लड सेंटर, धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. वैद्यकीय पथकांनी प्रत्येक रक्तदात्याची तपासणी करून सुरक्षिततेसह संकलन प्रक्रिया पार पाडली. यावेळी रक्तपेढीचे संचालक योगेश महाले, वेदांत कुलकर्णी यांनी काम पाहिले.
या सेवाभावी उपक्रमात महेश धर्मराज पाटील,सरपंच जगदीश पाटील,कळंबू सरपंच
राज राजपूत, अमृत पाटील, संजय पाटील, भैय्यासाहेब पाटील, नितीन पाटील, समाधान पाटील, गोविंदा पाटील, शेखर पाटील, विक्की पाटील आदींसह एकूण ५० पेक्षा अधिक युवक-युवतींनी आपले अमूल्य रक्तदान करत सामाजिक बांधिलकी जपली. यामध्ये महिला रक्तदात्यांचाही सहभाग लक्षणीय होता.
रक्तदान शिबिराचे आयोजक तथा चेअरमन बाम्हणे विविध कार्यकारी सोसायटी आणि पोलीस पाटील बाम्हणे गणेश भामरे यांच्या सह सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक अभिजीत देवरे, जिल्हा परिषद शिक्षक नंदलाल पाटील सर, तलाठी सचिन बमनाथ, विकेश भोई, शिपाई अधिकार पाटील, तसेच महावितरणचे वायरमन नगराळे आप्पा यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी सक्रिय सहकार्य केले.
या रक्तदान शिबिराच्या यशस्वितेमागे अनेक निस्वार्थ सामाजिक कार्यकर्ते तसेच धर्मराज रावण पाटील, यशवंत पोपट पाटील, दत्तात्रय पाटील, प्रविण ओंकार पाटील, विजय लोटण पाटील (उपसरपंच), रमेश विनायक पाटील, हिरालाल बाबुराव पाटील, आधार बळीराम पाटील, संतोष पाटील, सुनिल पाटील, यांनी संयोजन, संपर्क, सजावट, सुविधा आणि समन्वय यामध्ये महत्त्वाची जबाबदारी लीलया पार पाडली.
समाजसेवेची प्रेरणा –
आ.अनिल पाटील हे
अनेक वर्षांपासून समाजसेवेचा ध्यास बाळगणारे आणि आपल्या प्रत्येक वाढदिवशी लोककल्याणकारी उपक्रम राबविणारे आमदार असून मतदारसंघात “जनतेचा आमदार” म्हणून ते ओळखले जातात. आरोग्य, शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रात त्यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे त्यांच्यावर जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.आज त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने “रक्तदानासारखा जीवनदायी उपक्रम केवळ वाढदिवस साजरा करण्यापुरता मर्यादित न राहता,यापुढेही ही चळवळ कायम ठेवून संपूर्ण समाजाला प्रेरणा देणारे कार्य करायचे आहे.
महेश धर्मराज पाटील
(सामाजिक कार्यकर्ते बाम्हणे)