मोबाईल हॅकिंगची शंका – ‘पैसे पाठवा’ असे मेसेज आल्यास विश्वास ठेवू नका : दीपक सूर्यवंशी(वाघोदा) यांचे नागरिकांना आवाहन
अमळनेर प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य स्टुडंट्स असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांचा मोबाईल हॅक झाल्याची शक्यता असून, त्यांच्या नावाने काहीजणांना “मी दीपक पाटील बोलतोय, मला पैशाची गरज आहे, कृपया पैसे पाठवा” अशा प्रकारचे भामटेपणाचे मेसेज जात असल्याचे निदर्शनास आले आहे.
या प्रकाराबाबत दीपक सूर्यवंशी यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की, अशा कोणत्याही मेसेजला बळी पडू नये, कारण हे संदेश त्यांच्या माहितीत किंवा नियंत्रणात नसलेल्या व्यक्तींमार्फत पसरवले जात आहेत.
“माझा मोबाईल हॅक झाल्यामुळे अनेक ओळखीतील आणि अनोळखी व्यक्तींना हे मेसेज गेले आहेत. त्यामुळे कृपया कोणीही अशा प्रकारच्या मागणीवर विश्वास ठेवू नये,” असे आवर्जून सांगत सूर्यवंशी यांनी पोलिसांत तक्रार करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचेही नमूद केले.
संबंधित नागरिकांनी अशा मेसेजबाबत तात्काळ सतर्क राहून फसवणुकीपासून स्वत:चे संरक्षण करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.