
जानवे जंगलात सापडलेल्या मृतदेहामागे होता ‘खूनी प्लॅन’ – अमळनेर पोलिसांची यशस्वी कारवाई”
“जानवे जंगलात सापडलेल्या मृतदेहामागे होता ‘खूनी प्लॅन’ – अमळनेर पोलिसांची यशस्वी कारवाई”
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर पोलीस स्टेशन येथे दिनांक २३/०७/२०२५ रोजी अकस्मात मृत्यु क्रमांक ५९/२०२५ बीएनएसएस कलम १९३ प्रमाणे दाखल करण्यात आला होता. सदर अकस्मात मृत्युचे घटनास्थळ हे जानवे वनक्षेत्रातील असल्याने व पारोळा पोलीस स्टेशन गुरनं १५४/२०२५ येथे घटनास्थळापासुन ०१ किमी पेक्षा क्षेत्रातील असल्याने सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी याचा सदर अमृच्या अनुषंगाने चौकशी केली असता मयत वैजंताबेन भगवान भोई वय-५० वर्ष रा. १५७, कुबेरनगर, २-/१ कतारगाम दरवाजा, सुरत शहर, सुरत राज्य-गुजरात हिचा आधारकार्ड व मोबाईल क्र.९९७८२३६७०१ चा तपासादरम्यान तांत्रिक, मौखीक व घटनास्थळावरील उपलब्ध पुराव्यावरुन मयत वैजंताबेन भगवान भोई हिचा अनिल गोविंदा संदानशिव रा. सुमठाणे ता. पारोळा याने खुन केल्याचे निष्पन्न झाल्याने अमळनेर पोलीस स्टेशन सीसीटीएनएस गुन्हा रजि न.३०४/२०२५ दिनांक २५/०७/२०२५ रोजी दाखल करण्यात आला आहे
सदर अकस्मात मृत्युचा तपास पोउपनि समाधान गायकवाड यांनी केला असुन मयत वैजंताबेन भगवान भोई व संशयित आरोपी अनिल गोविंदा संदानशिव याने केलेबाबत तांत्रिक तपासात निष्पन्न झाले आहे. मयत हिचा मोबाईल क्र. ९९७८२३६७०१ व संशयित आरोपी अनिल संदानशिव याचा मोबाईल क्र.९१४६७६९८११ हे दिनांक ०२/०५/२०२५ ते दि.०५/०५/२०२५ दरम्यान वेळोवेळी संपर्कात असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे. सदर अकस्मात मृत्यु मधील मयत हिस काहीतरी अमिष दाखवुन आरोपी जानवे ता. अमळनेर वनक्षेत्रात घेवुन जावुन तिचा निघुण हत्या केली आहे.
सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, मा. अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, मा.अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे व तांत्रिक विश्लेषणानुसार आम्ही पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोनि संदिप पाटील नेम-स्थागुशा, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल नेम-स्थागुशा, पोलीस उपनिरीक्षक समाधान गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर पोहकों/कैलास शिंदे, पोहेकॉ काशिनाथ पाटील व पोकॉ/सागर साळुंखे यांनी मिळुन आलेल्या मानवी अवशेषावरुन सदर गुन्हा अनिल गोविंदा संदानशिव यानेच केला बाबत निष्पन्न केले असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास आम्ही पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहोत.