
शाळांना वेतन अदा विद्यार्थी आधार
प्रमाणित करण्याच्या अटीमध्ये सुधारीत अध्यादेश काढा
महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघाचे(फेडरेशन) शालेय शिक्षण सचीवांना पत्र
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
शासन निर्णय ६-२-२०२३ नुसार पात्र ठरणाऱ्या शाळांना वेतन अदा विद्यार्थी आधार प्रमाणित करण्याच्या अटीमध्ये सुधारणा करणेबाबत या जाचक अटिमुळे अनेक शाळेतील मुख्याध्यापक अडचणीत सापडले आहेत यासाठी शिक्षण सचिवांनी सुधारित अध्यादेश काढावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे व सचिव शालिग्राम भिरूड यांनी एक पत्रकाद्वारे केली आहे.
सविस्तर माहिती अशी कि
दि. ६ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार राज्यातील पात्र शाळांना वेतन अनुदानअदा करावयाचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणित करणे अनिवार्य केलेले आहे. मात्र दि. ३१मार्च २०२३ पर्यंत च्या मुदतीत ‘आधार प्रमाणित करण्यामध्ये पुढील तांत्रिक अडचणी निर्माण होत
आहेत.
१) ज्या विद्यार्थ्यांचे आधार सकाळी प्रमाणित ( Valid) होतात. त्यांचे आधार संध्याकाळी मात्र
‘अप्रमाणित ‘ ( invalid) दर्शविले जात असल्याचा काही जिल्ह्यातून संघटनेकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
(२) नुकत्याच इ.वी व इ. १२ वी च्या बोर्ड परीक्षा झाल्याने सदर विद्यार्थी आधार साठी उपलब्ध
होण्यात स्थानीय स्तरावर अडचण निर्माण झालेली आहे.
(३)
आधार प्रमाणित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खंडित विद्युत पुरवठा तसेच संगकणीय सपोर्ट सिस्टीम मध्ये अनियमितता आढळून येत आहे.
दि. ३१ मार्च २०२३ पूर्वी आधार अनिवार्य केल्याने उपलब्ध अत्यंत सीमित वेळेत याअटीची पूर्तता करणे जिकिरीचे झाल्याबाबतच्या तक्रारी राज्यभरातून मोठ्या प्रमाणात संघटनेकडे येत आहेत.
वरील वस्तुस्थिती विचारात घेता दि.६ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयाचा शाळांना प्रत्यक्षात लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणित च्या अटीमध्ये संबंधी सुधारित आदेश तातडीने प्रसृत
होणे आवश्यक आहेत. आपणास विनंती की, आपण या संबंधी संबंधितांना उचित निर्देश द्यावेत व
सहकार्य करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे व सेक्रेटरी शालिग्राम भिरुड यांनी केले आहे.