• Tue. Jul 8th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

अमळनेर तालुक्यातील सामाजिक बांधिलकी जोपासणारे युवानेतृत्व नानासाहेब विक्रांत पाटील..

Aug 13, 2023

Loading

जाहिरात…

अमळनेर तालुक्यातील सामाजिक बांधिलकी जोपासणारे युवानेतृत्व नानासाहेब विक्रांत पाटील..

वाढदिवसाच्या निमित्ताने दोन शब्द…..

सामाजिक बांधिलकी जोपासणारे युवा नेतृत्व नानासाहेब विक्रांत पाटील…

कदम ऐसा चलो, की निशान बन जाये !

काम ऐसा करो की पहचान बन जाये!

यँहा जिंदगी तो सभी जी लेते है !

मगर जिंदगी जियोे तो ऐसीे !

कि सबके लिए मिसाल बन जाये!……

ज्ञानाने माणूस मोठा होत असला तरी ज्ञानाला संस्काराची जोड मिळाली तरच माणूसकीचा व माणसातील माणूसपणाचा एक चांगला आविष्कार पहावयास मिळतो. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे नानासाहेब विक्रांत भास्करराव पाटील..
माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांचे खांदे कार्यकर्ते म्हणून नानासो विक्रांत पाटील यांची ओळख आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नानांनी सामाजिक कार्याला झोकून दिले आहे. नानासाहेब यांचे स्वप्न पत्नी स्वप्ना पाटील अमळनेर नगरपरिषद मध्ये प्रभाग क्रमांक 17 अ, मध्ये उभे राहून सामाजिक कामाला प्राधान्य देणार आहे. प्रभागाच्या विकासासाठी नेहमीच कटिबद्दल राहणार आहेत.. सध्या प्रभाग 17 अ ,मध्ये नानासो विक्रांत पाटील यांनी सामाजिक कामाला प्राधान्य दिले आहे..व नविन प्रभाग क्रमांक १७ अ महिला राखीव नगरसेविका पदावर सौ स्वप्ना विक्रांत पाटील उमेदवारी करणार आहेत असे नानासाहेबांनी सांगितले..वरील प्रभागामध्ये त्यांनी सामाजिक कामांना अधिक प्राधान्य दिले आहे.
सामाजिक काम करत असतांना त्यांची पत्नी स्वप्ना विक्रांत पाटील यांनाही सामाजिक कार्याची तेवढीच आवड आहे..त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवून मतदारांच्या मनात प्रेम निर्माण केले आहे. नानासो विक्रांत पाटील यांनी आजतागायत अमळनेर तालुक्यातील अनेक सामाजिक कामांना उपस्थिती लावत कोरोना सारख्या परिस्थितीत त्यांनी यथाशक्ती प्रमाणे उपेक्षित गरजूंना मदतीचा दिला आहे. शहरातील कोणत्याही कार्यक्रमात त्यांचा विशेष सहभाग असतो. मदतीसाठी आर्थिक हातभार त्यांचा मोठा असतो.. त्यांचा मैत्रीच्या गोतावळा मोठा आहे.. नानासाहेब यांचा सर्वच पक्षातील नेते, कार्यकर्ते नागरिक यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत. मितभाषी व शांत व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
नानांचा स्वभाव हा सर्वांना वर-वर प्रसन्न हसतमुख दिसतो.. मात्र प्रत्यक्षात नानांच्या व्यथा, डोक्यातील विचार इतरांना जाणून न देता चेहऱ्यावरील हास्याची सांगड घालण्यात नाना पटाईत आहेत. ते विनम्र व्यक्तिमत्व आहे.नानासाहेब म्हणजे सर्वांना सोबत घेऊन चालणारे व्यक्तिमत्त्व आहे तेवढेच सत्य.. नानासाहेब तुमच्या सहवासात आमच्या वहिनी व परिवार खंबीरपणे उभा राहिला आहे. त्यांचा शांत स्वभाव बरचं काही सांगतो.. फुलाच्या परिमाला सारखा आपल्या कर्तुत्वाच्या सुगंध अमळनेर तालुक्यात दरवडत राहो..
नानासाहेब यांना वाढदिवसाच्या निमित्ताने दोन शब्द …..
नानासाहेब १४ आँगष्ट आपला वाढदिवस…
तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत आणि,
एकंदरीत तुमचे आयुष्यच एक अनमोल आदर्श बनावे !
ईश्वर आपणांस दीर्घायुष्य देवो व आपल्या आयुष्यात आपणांस हवे ते मिळो
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा……..

शब्द संकलन
ईश्वर .आर. महाजन
मुख्यसंपादक
मराठी लाईव्ह न्युज
अमळनेर
9860352960

जाहिरात..
नानासाहेब यांचे काही सामाजिक कामातील फोटो..

You missed