• Tue. Jul 8th, 2025 7:58:17 AM

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

कर्तुत्ववान लोक कधीच सेवानिवृत्त होत नाही-

Sep 5, 2023

Loading

कर्तुत्ववान लोक कधीच सेवानिवृत्त होत नाही……

प्रा.श्रीमंत शिवाजी कोकाटे
इतिहास तंज्ञ,सुप्रसिद्ध वक्ते

प्रा.अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त
व्याख्यान संपन्न

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)-कर्तुत्ववान लोक सेवानिवृत्त होत नाही, जे सतत काम करतात ते कधीही सेवानिवृत्त होत नाही,
थोरपुरुषाचे कार्य तरूण पिढीला देण्याची गरज आहे,आपल्या देशात अनेक भेद आहेत.देशाला वाचविण्यासाठी महापुरुष यांच्या विचारांची गरज आहे, जो देश आपला इतिहास विसरतो तो देश इतिहास घडवू शकत नाही असे डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते,देशात लिंगभेद आहे,समाजाला गुलामगिरी तून बाहेर काढायचा असेल तर त्यांना खरा इतिहास सांगितला पाहिजे. चुकाचा इतिहास सांगून खुप प्रबोधन सांगितले गेले ते थांबविणे गरजेचे आहे असे अमळनेरला छत्रपती शिवाजी महाराज नाटयसभागृहात प्रा.अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इतिहास तंज्ञ,अभ्यासक व सुप्रसिद्ध वक्ते प्रा.श्रीमंत शिवाजी कोकाटे बोलत होते….
ते पुढे म्हणाले की शाहू महाराज म्हणत कर्मवीर भाऊराव पाटील यांना परीक्षेत कमी गुण आहेत पण ते हुशार आहेत,मार्काचा व गुणवत्तेचा संबंध नाही असे सांगत न्युटने इतिहास घडविला,दादा कोंडके,अमिताभ बच्चन, नल्सेन मंडेला, नागराज मजुंळे,शरद पवार यांचा सकारात्मक दुष्टीकोन होता.त्यांनी आपले देशात नावलौकिक केला. शिक्षणाचे मूहर्तमेढ रोवणारे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले व कांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस हा शिक्षक दिवस म्हणून साजरा केला पाहिजे त्यांनी खऱ्या अर्थाने शिक्षणाची दारे सर्वांसाठी खुली केली पण आज आपल्या देशात 5 सप्टेंबर शिक्षक दिवस साजरा होतो. अंधश्रद्धेवर प्रहार करताना ते म्हणाले लग्नाच्या वेळी मुला मुलींचे गुरु पाहण्यापेक्षा त्यांची गुणवत्ता पहा..राशी भविष्य थोतांड आहेत, कर्तुत्व श्रेष्ठ आहे असे सांगितले. त्यांनी पाप व पुण्याचा अर्थ सांगताना सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात एखाद्या गरजूला मदत करणे म्हणजे ते पुण्य होते. व एखाद्याला वाऱ्यावर सोडणे म्हणजे ते पाप होते पण आज पापपुण्याची व्याख्या बदलली आहे.कोणत्याही दिशा वाईट नाहीत, माणसाने त्यांना आपल्या सोयीने नावे दिली आहेत. पण आज दिशांच्या मागे मानव गुरफटून गेला आहे.
आहाराचा व माणसाचा काही संबंध नाही असेही त्यांनी सांगितले.मंदिराचा पैसा शिक्षणावर खर्च करणारे देशातील पहिले राजे राजर्षी शाहू महाराज होते.शासन आता शिक्षणावर फक्त तीन टक्के खर्च करतो. छत्रपती शहाजी महाराजांच्या काळात शिक्षणावर 23 टक्के खर्च होता.
ते राजकारणावर बोलतांना म्हणाले की
एखादा पक्षातील नेता उपमुख्यमंत्री करतो म्हणून सकाळी शपथ घेतात.. कुठे आहे निष्ठा..? सध्या महाराष्ट्रात सत्तेसाठी सर्व एकत्र आलेले आहेत स्वाभिमान उरला नाही.. राजर्षी शाहू महाराज यांनी प्राथमिक शिक्षण मोफत दिले,सर्व समाजाला आरक्षण दिले, आताचे राजकीय पुढारी आरक्षण देणार नाही, आरक्षणाच्या नावाखाली स्वतःची पोळी शिकून घेतली राजकारण करतील एवढेच त्यांच्याकडून अपेक्षित आहे असे त्यांनी सांगितले.
विचारपीठावर व्याख्याते प्रा.डॉ. श्रीमंत शिवाजी कोकाटे,सामाजिक कार्यकत्या प्रतिभाताई शिंदे, अर्जुन कोकाटे सर,प्रा.अशोक पवार,प्रा.डॉ. लिलाधर पाटील,शिवमती मानसी पवार होते. अगोदर सर्व बहुजन समाजातील नेत्यांचे प्रतिमापूजन करण्यात आले.
व्याख्यानमालेत अगोदर प्रा. अशोक पवार यांच्या प्रति कृतज्ञता लोकसंघर्ष संघटनेच्या नेत्या प्रतिभाताई पाटील,सुप्रसिद्ध युवा वक्ते प्रा.डॉ लिलाधर पाटील, राष्ट्रसेवा दलाचे अध्यक्ष
येवला येथील अर्जुन कोकाटे,मा.सरपंच महेंद्र बोरसे यांनी व्यक्त केली ते म्हणाले की बुद्धीजीवी माणूस समाजपरिवर्तन करत असतो त्याला हिणवले जाते,लोकशाही जिवंत करणारा हा कार्यक्रम आहे..आज देशात माणसाच्या बोलण्यावर बंदी घातली जाते पण तुम्ही प्रा.पवार सर आपण बोलणारे कार्यकर्ते तयार केले आहेत असे सांगितले.
प्रा.अशोक पवार यांच्या कार्याचा गौरव म्हणून सन्मान पत्र,शाल देऊन सत्कार बाजार समितीचे सभापती अशोक पाटील,सेवानिवृत्त केंद्रप्रमुख भागवत गुरुजी, समाधान धनगर,नितीन निळे
मच्छिंद्र लांडगे यांनी केला तर चेतनभाऊ शहा ,भारती गाला,गौतम मोरे
जयवंतराव पाटील,प्रा एस.टी.माळी यांनी सत्कार करत शुभेच्छा दिल्या.सौ वसुंधरा लांडगे यांनी जिजाऊ वंदना सादर केली.
तर व्याख्याते श्रीमंत कोकाटे यांचा परिचय प्रा.गौतम मोरे यांनी करुन दिला.
शेवटी प्रा.अशोक पवार सर यांनी कृतज्ञता व्यक्त करत सांगितले की आज माणूस नैराश्य, ताणतणाव, अस्वस्थता यात गुरफटला आहे यावर उपाय एकच आहे महापुरुष वाचले पाहिजे व चळवळीत यावे असेही त्यांनी सांगितले.
रणजित शिंदे यांनी सुत्रसंचालन व आभार व्यक्त केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बापूराव ठाकरे,प्रेमराज पवार
डि.ए.पाटील,सोपान भवरे,अजय भामरे सह मित्रपरीवाराने सहकार्य केले.यावेळी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रातील व्यक्ती व महिला व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed