• Tue. Jul 8th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

जायन्टस गृप ऑफ अमळनेर पदग्रहण समारंभ संपन्न

Nov 13, 2023

Loading

जायन्टस गृप ऑफ अमळनेर पदग्रहण समारंभ संपन्न

अमळनेर: सामाजिक कार्यासाठी कार्यरत असलेले आंतरराष्ट्रीय जायन्टस वेल्फेअर फौंडेशनच्या अमळनेर जायन्टस ग्रुप चे पदग्रहण नुकतेच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
अमळनेर शाखेचे संस्थापक अध्यक्ष म्हणुन सुनील पंडीतराव पाटील व इतर पदाधिकारी यांचा शपथविधी झाला. जायन्टस फेडरेशनच्या अध्यक्षा ॉड सौ संगिता एच पाटील यांच्या प्रयत्नांनी हा शहरातला तीसरा ग्रृप स्थापन झाला आहे.धुळे येथील प्रसिध्द हृदयरोगतज्ञ डाॅ दिलीप आर पाटील यांनी निरोगी जीवनशैलीवर मार्गदर्शन केले. माजी आमदार डाॅ बी एस पाटील यांनी सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्‍यांची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय मनोगत डाॅ अविनाश आर जोशी यांनी व्यक्त केले.जायंटसचे स्पेशल कमिटी सदस्य रविंद्र जमादार यांनी मनोगत व्यक्त केले.जायन्टस फेडरेशनचे माजी अध्यक्ष माधव पटेल ,शहादा जायन्टसचे अध्यक्ष तथा खान्देशातील पारंपारिक बियाण्यांचे संशोधक माजी प्राचार्य डाॅ एच एम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.पदाधिकारी व सदस्यांचा
शपथविधी जायन्टस फेडरेशन सदस्य कैलास भावसार यांच्या हस्ते झाला. प्रास्ताविक जायन्टस फेडरेशन अध्यक्षा ॲड संगिता एच पाटील यांनी केले.आभार जायन्टस वीरांगना सहेली दिपीका सोनवणे यांनी मानले. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन शहादा जायन्टसचे डायरेक्टर विष्णु जोंधळे यांनी केले.

कार्यक्रमासाठी शहादा जायन्टस सहेली अध्यक्षा अरुणा पाटील ,जायन्टस हिरकणी सहेली अध्यक्षा मनिषा पाटील , जायन्टस जिजाऊ सहेली अध्यक्षा स्नेहलता पाटील, तसेच रोटरी क्लब,…
लायन्स क्लब अमळनेरचे..मान्यवर … आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

पदग्रहण करणारे पदाधिकारी व सदस्य पुढील प्रमाणे
अध्यक्ष सुनील पंडीतराव पाटील
उपाध्यक्ष अश्विन लिलाचंद पाटील,रमेश पंढरीनाथ महाजन, सचिव प्रशांत भटु पाटील, कोषाध्यक्ष ॲड राजेंद्र भगवान चौधरी तर
संस्थापक संचालक स्वप्नील पाठक,डाॅ निलेश शिंगाणे,सुशांत पाटील, जयविरसिंग पाटील, प्रदिप शिंगाणे, राजेंद्र भावसार, महेश पाटील, सुनील काटे,चंद्रकांत पाटील
तथा
संस्थापक सदस्य

भुषण सोनवणे,राकेश माहेश्वरी, संतष वाघ, रविंद्र पाटील,धनंजय पाटील, संदीप महाजन,राजमल पाटील, दिपक पाटील, कुलदिप कदम यांचा समावेश होता.
जायन्टसचे मार्गदर्शक म्हणुन प्रा डाॅ यु जी देशपांडे, प्रा डाॅ वाय बी पाटील डाॅ महेश रमण पाटील, प्रा प्रविणकुमार भावसार, प्रा डाॅ सुधीर पाटील यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed