अमळनेरला काँग्रेस पक्षाच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी
अमळनेर प्रतिनिधी- अमळनेर येथे काँग्रेस पक्षाच्या वतीने मा.पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती उत्साह पूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला.
पंडित जवाहरलाल नेहरू हे असे राजकारणी होते ज्यांनी प्रत्येकाच्या जीवनावर आपल्या व्यक्तिमत्त्वाचा प्रकाश टाकला आहे. एवढेच नाही तर पंडित नेहरूंना समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताकचे शिल्पकारही मानले जात होते. पंतप्रधानपद भूषवतांना पंडित नेहरूंनी देशाच्या विकासासाठी अनेक महत्त्वाच्या गोष्टी केल्या, त्यासोबतच त्यांनी सशक्त राष्ट्राचा पाया घातला आणि भारताला आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. यासोबतच त्यांनी भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासालाही प्रोत्साहन दिले असे मान्यवरांनी सांगितले.
यावेळी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष गोकूळ बोरसे,कार्याध्यक्ष प्रा. श्याम पवार,
शहराध्यक्ष मनोज पाटील ,बाजार समितीचे संचालक सुभाष पाटील ,काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष बन्सीलाल भागवत गुरुजी ,माजी तालुका अध्यक्ष भागवत सूर्यवंशी, तालुका किसान सेलचे रोहिदास पाटील ,बाळा पाटील हिंगोणे, राजू दादा फाफोरेकर माजी नगरसेवक, पी वाय पाटील शहर सरचिटणीस, हिरामण कंखरे सामाजिक कार्यकर्ते ,प्रकाश पाटील मुख्याध्यापक संघाचे तालुकाध्यक्ष, पत्रकार ईश्वर महाजन, प्रसाद शर्मा इंटक युनियन, निलेश शर्मा सामाजिक कार्यकर्ते, निळकंठ तात्या तालुका काँग्रेस सरचिटणीस, देवकाते प्रशांत, उमाकांत ठाकूर ,आशिष शर्मा असे अनेक काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष बन्सीलाल भागवत यांनी केले तर आभार शहराध्यक्ष मनोज पाटील यांनी मानले.




