

आज आमच्या स्व. आबासाहेब अनिल अंबर पाटील माध्यमिक व डॉ. अस्मिता प्रतापराव दिघावकर उच्च माध्यमिक विद्यालय मंगरूळ तालुका अमळनेर येथे “तालुका विधी सेवा समिती ” व “अमळनेर वकील संघ” अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने विधी सेवेचे प्रचार व प्रसार निमित्त कायदेविषयक जनजागृती शिबिराचे मा.ना. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्याकडून माहे नोव्हेंबर 2023 मध्ये कायदेविषयक व जनजागृती शिबिराचे आयोजन करण्याबाबतचे निर्देश देण्यात आले होते त्यानुसार विद्यालयात माननीय श्री एन. आर. येलमाने साहेब “सहाय्यक दिवाणी न्यायाधीश “क” स्तर अंमळनेर यांनी “राष्ट्रीय विधी सेवा दिवस” या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व ॲड .श्री के आर बागुल अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अमळनेर यांनी “राष्ट्रीय शिक्षण दिवस” या विषयावर विद्यार्थ्यांना माहिती दिली व तसेच ॲड. श्री डी.पी.परमार अध्यक्ष वकील संघ अमळनेर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली व तसेच विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक प्रभुदास पाटील यांनी सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले यावेळी मुख्याध्यापक श्री प्रकाश पाटील. श्री संजय पाटील. श्री अशोक सूर्यवंशी. श्री राजेंद्र पाटील. श्रीमती सुषमा सोनवणे. श्रीमती शितल चव्हाण. श्रीमती सीमा मोरे. श्री मनोज पाटील. श्री राहुल पाटील.खुशाल पाटील. प्रदीप पाटील.मान्यवर उपस्थित होते