
महात्मा फुलेंच्या चळवळीला पुढे नेणारा आद्यगुरु लहुजी साळवे!!
महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या पुरोगामी चळवळीत अप्रतिम योगदान दिलेल्या लहुजी साळवे यांची आज जयंती.महात्मा फुले यांना कसरतीचे धडे देणारे वस्ताद म्हणजे लहुजी साळवे. त्यांनी जोतिराव फुलेंना कुस्ती, काठी फिरवणे, भाला फेक, तलवार फिरवणे यासारखे शिक्षण दिले होते. महात्मा फुले हे पट्टीचे पहेलवान होते.त्यांना सर्व प्रकारचे डावपेच शिकविले होते. असंख्य युवकांना लहुजी साळवे यांनी कसरतीचे शिक्षण दिले. सनातन्यांनी सावित्रीमाई यांना शिकविण्याच्या प्रकियेत अडचणी तयार केल्या. त्यावेळी लहुजी साळवे यांनी सनातन्यांना खडसावून सांगितले की, सावित्रीमाईच्या केसाला जर हात लावला तर शनिवार वाडयात एकाही सनातन्यांना फिरकू देणार नाही. असा सज्जड दम दिला होता. लहुजी वस्ताद च्या तालमीत असंख्य तरुण दररोज सरावाला येत. महात्मा फुले यांनी तरुणांच्या मदतीने पुरोगामी ब्राम्हणांना सहकार्य केले. त्यामुळेच फुलेंची कार्य जनमानसाच्या मनात रूजले. ह्या महानायकाला त्यांच्या कार्यात त्यांच्या गुरूने म्हणजे लहुजीने साथ दिली. पुणे सारख्या मनुवादयांच्या छावणीत लहुजीच्या सकारात्मक विचाराने सत्यशोधक चळवळीला चालना मिळाली. मुलीच्या शाळेत मुली येत नव्हत्या त्यासाठी लहुजीने आपल्या घरातील मुक्ता साळवे हिला शाळेत पाठवुन शाळेचे उद्घाटन केले. मुक्ता ने निबंधात आम्ही हिंदू मग आम्हाला मंदिरात प्रवेश का नाही?शिक्षण का नाही हा खडा सवाल विचारला. अशा लिहिलेल्या निबंधाने शिक्षणाचा हेतू महात्मा फुलेंच्या शाळेचा हेतू सफल झाला. सत्यशोधक विचार स्वत: अंमलात आणणाऱ्या महान नायकास विनम्र अभिवादन!!