• Tue. Jul 8th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

कॅबिनेट दर्जा असलेले वारकरी महामंडळ शासनाने निर्माण करावे… ज्येष्ठ समाजसेवक ह भ प डॉ. रवींद्र दि भोळे

Nov 14, 2023

Loading

कॅबिनेट दर्जा असलेले वारकरी महामंडळशासनाने निर्माण करावे… ज्येष्ठ समाजसेवक ह भ प डॉ. रवींद्र दि भोळे

शिंदवणे पुणे: व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, एड्स निर्मूलन विविध लोक कल्याणकारी योजनेसाठी शासन करोडो रुपये खर्च करीत असते. मात्र उद्देश्य सफल होत नसतो. दारू अफू ,गांजा ,हिरोईन , चरस, ब्राऊन शुगर ह्या अमली पदार्थांच्या सेवनाने तरुण पिढी बरबाद होत असते. वारकरी सांप्रदाय समाजातील रूढी परंपरा व सध्या स्थितीवर सखोल अभ्यास करून कीर्तने प्रवचने प्रबोधने याद्वारे व्यसनमुक्तीचे महान कार्य समाजात रुजवित असते.त्याचप्रमाणे समाज प्रबोधन ,समाज उन्नयन ,व समाज पुनरुस्थापनाचे महान कार्य सांप्रदायातील वारकरी प्रवचनकार कीर्तनकार करीत असतात. महाराष्ट्राच्या पवित्र संतांच्या भूमीत कॅबिनेट दर्जा असले वारकरी महामंडळ निर्माण व्हावें ,या मार्फत समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या वारकरी प्रवचनकार प्रबोधनकार,कीर्तनकार यांना व्यसनमुक्ती करण्यासाठी प्रवृत्त केल्यास आतून व बाहेरून निरोगी सात्विक समाज निर्माण होईल. यासाठी कॅबिनेट दर्जा असले वारकरी महामंडळ शासनाने निर्माण करावे असे मत ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ. रविंद्रजी भोळे यांनी येथे व्यक्त केले. शिंदवणे येथे अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन सालाबाद प्रमाणे समस्त ग्रामस्थ शिंदवणे यांच्या वतीने करण्यात आले होते. या प्रसंगी प्रवचनात वरील मत डॉ. रवींद्र भोळे यांनी व्यक्त केले .ते पुढे म्हणाले की लाखो भाविक भक्त वारकरी पंढरीला पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी जातात परंतु कधीही वारकऱ्यांनी वारकरी नीती नियम तोडले नाहीत. सर्व धर्म समभावाची जपणूक करणारा वारकरी दया, क्षमा, शांतीची पताका घेऊन मानव जातीचे कल्याण करण्याची भावना रूजवित असतो.मोक्ष मिळवण्यासाठी धडपडत असतो. न लगे चंदना सांगावा परिमळ/ वनस्पती मेळ हाकरुण /अंतरीचे घावे स्वभावे बाहेरी /घरिता परी ही आवरेना /सूर्य नाही जागी करीती या जना /प्रकाश किरण कर म्हून /तुका म्हणे मेघ नचवी मयुरे /लपविता खरे येत नाही /या संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे वारकरी सांप्रदायाचे कार्य जगाच्या कल्याणासाठी चालते या सांप्रदायाचा व्यापक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून कॅबिनेट दर्जा असले वारकरी महामंडळ शासनाने नियुक्त करावे असे मत प्रबोधनकार प्रवचनकार डॉ. रवींद्र भोळे यांनी येथे व्यक्त केले. या कार्यक्रमामध्ये ह भ प चंद्रकांत महाराज यादव, ह भ प सुदाम काका पुजारी ,ह भ प राहुल महाराज ढवळे, ह भ प डॉ.रवींद्रजी भोळे, ह भ प पांडुरंग महाराज आंबोरे, ह भ प सिद्धेश्वर महाराज वानखडे ,ह भ प गजानन महाराज शिंदे ,यांची प्रवचने झाली. त्याचप्रमाणे ह भ प संभाजी महाराज आपुणे, ह भ प बाळासाहेब महाराज झगडे ,ह भ प सुनीताताई आंधळे ,ह भ प गणेश महाराज फरताडे, ह भ प प्रा नवनाथ महाराज माशेरे ह भ प सुप्रियाताई साठे ,ह भ प ॲड धर्माचार्य शंकर महाराज शेवाळे, यांची कीर्तने झाली त्याचप्रमाणे ह भ प रामरावजी ढोक महाराज यांचे काल्याचे किर्तन झाले. समस्त ग्रामस्थ शिंदवणे अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वर पारायण सोहळा समिती यांच्या वतीने वरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी 28 वे वर्ष होते. गेली 28 वर्षे पासून ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार प्रबंधकार अपंग सेवक ह भ प डॉ. रवींद्रजी भोळे वरील अखंड हरिनाम सप्ताह मध्ये वारकऱ्यांची मोफत औषधोपचार वैद्यकीय सेवा करीत असतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed