• Tue. Jul 8th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

पत्रकारीतेचं स्वरूप व माध्यमे बदलली तरी पत्रकारीतेतली पायाभूत मूल्ये बदलली नाहीत ती भविष्यातही कायम राहतील : व्हॉइस मिडियाचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार डिगंबर महाले यांचे मार्मिक प्रतिपादन

Nov 15, 2023

Loading

पत्रकारीतेचं स्वरूप व माध्यमे बदलली तरी पत्रकारीतेतली पायाभूत मूल्ये बदलली नाहीत ती भविष्यातही कायम राहतील : व्हॉइस मिडियाचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार डिगंबर महाले यांचे मार्मिक प्रतिपादन

मराठी लाईव्ह न्युजच्या वर्धापन दिनाच्या औचित्याने विविध स्तरातील दहा कर्तुत्ववानांचा सन्मान…
अमळनेर प्रतिनिधी
पत्रकारितेचं स्वरुप व माध्यमे बदलली तरी पत्रकारितेतली पायाभूत मूल्ये बदलली नाहीत ; ती भविष्यातही कायम राहतील.विनयशीलता,विवेक मराठी लाईव्ह न्यूज ने कार्यप्रणालीत निरंतर जपला !! असे मार्मिक प्रतिपादन मंगळग्रह संस्थाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार डिगंबर महाले यांनी काढले.मराठी लाईव्ह न्युज चॅनेलच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त ‘ सत्कार कर्तृत्वाचा ‘ पुरस्कार सोहळा अमळनेर येथे रविवार दि.१२ नोव्हेंबर २०२३ रोजी साने गुरुजी ग्रंथालय जुना टाऊन हॉल येथे ज्येष्ठ पत्रकार डिगंबर महाले यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. त्याप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना महाले पुढे म्हणाले की,’ चांगल्या कामात सर्व लोक पाठीराखे असतात.मराठी लाईव्ह न्युज चॅनलने आजतागायत अमळनेर परिसरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खूप नावलौकीक प्राप्त केला.यामागे ईश्वर महाजन सरांची अजोड मेहनत आहे.शिक्षक असून पत्रकारितेतून निर्भयपणे तत्वनिष्ठेने सर्वसामान्यांना न्याय मिळवून देत समाज शिक्षकाच्या भूमिकेतूनही ईश्वर सरांनी शिक्षकी पेशाची प्रतिष्ठा व सन्मान वाढविला. विनम्रता,निःस्वार्थीपणा व सुसंवाद साधण्याची कला या गुणवैशिष्ट्यांमुळे ईश्वर महाजन सरांनी असंख्य गुणी मित्रपरिवार प्राप्त केला. सांगत अभिनंदन केले.सुयोग्य व्यक्तींची पुरस्कारासाठी निवड करून त्यांच्या कर्तुत्वाचा सन्मान करण्यासाठी ईश्वर सरांसारखे विशाल गुणग्राही आणि उदार मन असावे लागते.’ अमळनेरात पत्रकार बांधव खूप आहेत.साने गुरुजींनी कर्मभूमीत नैतिक कृतीशील विचारांची पेरणी केली.लक्ष्मी पूजनाच्या या पर्वात मराठी लाईव्ह न्यूज चॅनेलच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात उत्कृष्ठ कामाचा ठसा उमटविणाऱ्या दहा कर्तृत्ववान महानुभवांचा ‘ सन्मान कर्तृत्वाचा ‘ हया नावाने पुरस्कृत करण्यात आले.विचारमंचावर कपिल पवार ( उपसंचालक,नागपूर महानगर विकास प्राधीकरण ),सुनिल नंदवाडकर ( उपविभागीय पोलीस अधिकारी ), डाॅ. जयदीप पाटील,डाॅ.एस. आर.चौधरी, प्रकाश वाघ ( साने गुरूजी वाचनालय संचालक ),राजेंद्र खैरनार ( वित्त लेखाधिकारी ) उपस्थित होते.
प्रमुख अतिथी म्हणून डाॅ.जयदिप पाटील मार्गदर्शन करतांना म्हणाले की, ‘ पत्रकाराला समाजाची आई होता आले पाहिजे. अमळनेरचे नाव सर्वच क्षेत्रातील कामांसाठी प्रसिध्द आहे.विशेषतः पत्रकार क्षेत्रातही नावलौकीक आहे. महात्मा फुले,डाॅ .बाबासाहेब आंबेडकर हे महान पत्रकारही मुलतः प्रथम शिक्षकच होते. विषाला अमृत करण्याची ताकद पत्रकारात असते. म्हणून ब्रिटीश विद्रोही पत्रकारावर प्रथमतः कारवाई करीत.काळानुसार पत्रकारांनी डिजीटल युगात अद्ययावत होणे गरजेचे आहे. ज्याला काळाची पाऊले ओळखता येऊन समायोजन येते त्यालाच जग जिंकता येते.जगात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभाव वाढत आहे.जगण्यातील ऊर्जा व झपाटलेपण हरविता कामा नये.स्वत:च्या जीवनातील चैतन्याचा आत्मशोध प्रत्येकाने घेतला पाहिजे. चेहरा फिरवायला कर्तृत्व लागते.आपल्या सुंदर विचारातून डाॅ.जयदिप पाटील यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.प्रारंभी मराठी लाईव्ह न्यूजचे संपादक ईश्वर महाजन यांनी प्रास्ताविक केले.मान्यवरांनी आद्य पत्रकार दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून माल्यार्पण केले.मनोगतात माजी प्राचार्य एस.आर. चौधरी,संस्थाचालक विलासराव पाटील , कपिल पवार, पोलीस अधिकारी सुनिल नंदवाडकर यांनी विचार मांडले.पुरस्कारार्थी मुख्याध्यापक सतिष देशमुख,विजय पवार सर यांनी विचार मांडले.माजी आमदार शिरीषदादा यांनी आपल्या व्यस्त नियोजनातून वेळ देत कायम मराठी लाईव्ह न्यूजच्या पाठीशी उभे राहू याची ग्वाही मनोगतातून दिली.कार्यक्रमात समयोचित काव्यपंक्तींच्या संदर्भान्वये व प्रभावी भाष्याने सूत्रसंचालनातून वसुंधरा लांडगे यांनी उपस्थितांची मने जिकली .


क्षेत्र निहाय पुरस्कारार्थी

  • प्रा.जयदीप पाटील
    [ विज्ञान क्षेत्र ]
  • आदर्श माता पिता पुरस्कार एस.डी.देशमुख
    ( माजी मुख्याध्यापक,साने गुरुजी हायस्कूल, अमळनेर )
    कौटुबिक व सामाजिक क्षेत्र
  • प्रा.आर.बी.पवार व सौ. ज्योती पवार ( अध्यात्मिक क्षेत्र )
  • विक्रांत पाटील व स्वप्ना पाटील ( सामाजिक व राजकीय क्षेत्र )
  • संस्थात्मक पुरस्कार
    पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय संचलित सानेगुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा केंद्र ,अमळनेर
  • डॉ.योगेश महाजन
    ( दिव्यांगांसाठी उत्कृष्ट कार्य )
  • पक्षीमित्र अश्विन पाटील
    ( पर्यावरण , निसर्ग संवर्धन )
  • गणेश भामरे
    ( युवा प्रेरणा पुरस्कार )
  • भिकेश पावबा पाटील
    ( सामाजिक क्षेत्र )
  • युवा उद्योजक पुरस्कार
    अक्षय साळी उर्फ मोन्टी
    उपरोक्त यशस्वी गुणीजनांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र , शिल्ड,शाल,बुके देऊन सन्मानित करण्यात आले. सदरहू पुरस्कार वितरणा प्रसंगी कार्यक्रमात पुढील विशेष सत्कार करण्यात आले.
    विशेष सत्कारार्थी
  • पत्रकार मा .डिगंबर महाले
    [ औचित्य : व्हाईस मिडीयाच्या जिल्हाध्यक्षपदी सन्माननीय निवड ]
  • विलासराव पाटील
    [ काँग्रेस शिक्षक सेलच्या प्रदेश कार्यकारी प्रमुख ]
  • सौ.वसुंधरा लांडगे
    [ अर्बन बँकेच्या निवडणुकीत प्रंचड मतांनी निवड ]
  • डॉ.उदय पाटील व पिताश्री

वैद्य सतीश व्हि . शिंदाडकर एम.डी.लिखित आरोग्य पुस्तिकांचे ग्रंथप्रेमी विजय लुल्हे यांच्यातर्फे उपस्थितांना मोफत वितरण : –
वैद्य सतीश शिंदाडकर लिखित आरोग्य पुस्तिका अनुक्रमे – सांध्यांच्या विकारांपासून दूर राहा, ॲसिडिटी ( आम्लपित्त ), चिंता नको वार्धक्याची या पुस्तकांचे उपस्थितांना मोफत वितरण केले.
भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम पुस्तक भिशी जळगाव संस्थापक जिल्हाप्रमुख विजय लुल्हे यांचे ग्रंथप्रेम व वाचन चळवळ संवर्धनाचे व्यापक काम पाहून डॉक्टरांनी विजय लुल्हे यांना उपरोक्त आरोग्य पुस्तिका सादर सुपूर्द केल्या .लाईव्ह न्यूज चॅनेलच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या औचित्याने वैद्य शिंदाडकर उपप्राचार्य , आयुर्वेद महाविद्यालय , साकेगाव ) यांच्या सूचनेनुसार विजय लुल्हे यांनी सदर पुस्तिका उपस्थितांना स्नेहपूर्वक विनामूल्य भेट दिल्या.


या गुणवंत अन् यशवंत महानुभवांना मान्यवरांच्या हस्ते शाल,बुके देऊन गौरविण्यात आले.यावेळी प्रा.अशोक पवार ,संदीप घोरपडे ,विजय लुल्हे ( जळगाव ),बबली भाऊ पाठक,पकंज चौधरी, योगराज संदानशिव ,पत्रकार अरविंद सोनटक्के ,चेतन राजपूत ,संजय सुर्यवंशी,जयेश काटे,उमेश काटे,जयवंत वानखेडे,जितेंद्र पाटील,प्रा.गाढे सर,अजय भामरे,अनिल पाटील ,नुरखान,भटेजा,बापूराव ठाकरे ,समाधान मैराळे ,सुरेश कांबळे,प्रा.भिमराव महाजन,हितेश बडगुजर ,संभाजी देवरे,साहित्य परिषदेचे रमेश पवार,डॉ.कुणाल पवार रामकृष्ण बाविस्कर , मनोहर नेरकर ,दत्ता सोनवणे,शरद पाटील,अनिल पाटील प्रफुल्ल बोरसे,स्वप्निल पाटील,सतीश कांगणे,पी.एस.विंचूरकर,ज्ञानेश्वर इन्शुलकर ,आर.डी.चौधरी , साखरलाल महाजन ,ए.बी.धनगर,मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश पाटील,सुधीर चौधरी,प्रमोद पवार , प्रविण गोसावी, एस.के.महाजन,अनिल महाजन,सानेगुरुजी शिक्षक पतपेढीचे उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, ब्राम्हणकर सर,काशिनाथ माळी ( धुळे ) ,गोकूळ बागूल ,प्रफुल्ल बोरसे,हिंदी अध्यापक मंडळाचे अध्यक्ष आशिष शिंदे ,दिपक पवार ,दिनेश शेलकर ,ओबीसी संघटनेचे मनोहर पाटील सर,मनोहर भगवान महाजन (अध्यक्ष, क्षत्रिय काच माळी समाज ),गंगाराम निंबा महाजन (अध्यक्ष, क्षत्रिय काचमाळी समाज ),पांडुरंग नामदेव महाजन ( उपनगराध्यक्ष, न.प.अमळनेर ),बापूसो.गुलाब ओंकार महाजन ( उपाध्यक्ष ,क्षत्रिय काच माळी समाज ),बाबूलाल महाजन सर,गणेश महाजन सर,गणेश पांडुरंग महाजन,डॉ.राजेंद्र महाजन,अशोक महाजन,रवींद्र महाजन,कैलास महाजन,भाऊसाहेब महाजन ( नगरसेवक ),राजेंद्र भास्कर महाजन (पंच,क्षत्रिय काच माळी समाज ),बापूसो.सुदाम महाजन,मनोहर महाजन,सौ.रंजना मनोहर महाजन ( उपाध्यक्ष, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ ),सौ.मनीषा महाजन,सौ.अरुणा महाजन,सौ.अन्नपूर्णा महाजन,गं.भा.ज्योती महाजन,मंगलाताई जाधव,रामदास दौलत शेलकर ( उपनगराध्यक्ष ),साखरलाल महाजन सर,कैलास महाजन,ॲड.रमाकांत महाजन,शंकर महाजन,किशोर महाजन,प्रकाश महाजन,प्राचार्य डी.एड.कॉलेज अमळनेर,संजय महाजन,परिश्रम दिव्यांग मुला मुलींची निवासी शाळा पारोळा येथील मनीष जाधव,रामकृष्ण शेलकर सर,प्रताप पाटील सर,जगदीश सोनवणे सर,कुणाल महाजन,राजेंद्र महाजन,दीपक पानसे यांसह विविध क्षेत्रातील मित्र परीवार बहुसंख्येने उपस्थित होता.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पत्रकार ईश्वर महाजन,ज्योती महाजन,सोपान भवरे ,वेदांत महाजन व सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालयाचे संचालक मंडळ,कर्मचारी वृंद यांनी अमूल्य परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed