

हिरालाल पाटील यांची अमळनेर भाजपा तालुकाध्यक्षपदी फेरनिवड तर विजयसिंग राजपूत यांची शहरअध्यक्षपदी निवड
अमळनेर प्रतिनिधी- भाजपचे तालुका अध्यक्ष हिरालाल पाटील यांची त्यांच्या उत्कृष्ट कामामुळे त्यांची पक्षश्रेष्ठींनी पुन्हा तालुका अध्यक्षपदी निवड केली आहे. आगामी काळात येणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपच्या तालुका अध्यक्ष व शहराध्यक्षपदी तरुण चेहऱ्यांना भाजपने संधी दिली आहे.
सविस्तर माहिती अशी कि
चंद्रशेखर बावनकुळे,प्रदेशाध्यक्ष भाजपा यांच्या आदेश्याने मा.ना श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री , मा. ना.श्री गिरीश भाऊ महाजन.ग्रामविकास मंत्री, मा.श्री विजय भाऊ चौधरी.प्रदेश महामंत्री, मा श्री रविजी अनासपुरे.प्रदेश मुख्यालय प्रमुख. मा.श्रीमती स्मिताताई वाघ.प्रदेश उपाध्यक्षा यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज पाटील जलकेकर यांनी काल अमळनेर भाजपा तालुका अध्यक्ष म्हणून हिरालाल शांताराम पाटील. दहीवद खुर्द यांची फेरनिवड केली.व विजय सिंग राजपूत यांची शहर अध्यक्ष पदी निवड केली.या निवडीचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे. या निवडीचे खासदार मा उन्मेष पाटील, मा. आमदार मंगेश पाटील.पारोळा विधानसभा निवडणूक प्रमुख करण पाटील.लोकसभा निवडणूक प्रमुख डॉ राधेश्याम चौधरी,प्रदेश पदाधिकारी ॲड. व्हीं आर पाटील, भैरवी वाघ पलांडे, भारती सोनवणे.जिल्हा पदाधिकारी सचिन जी पानपाटील, भिकेश पाटील, बाळासाहेब पाटील,मीना पाटील, माजी सभापती शाम आहिरे, माजी कृ ऊ बा सभापती प्रफुल्ल बापू पवार.व सर्व भाजपा पदाधिकारी,लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले.
चौकट
अमळनेर भाजप तालुका अध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली त्याबद्दल भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आगामी काळात पक्ष संघटन साठी मी पूर्णपणे बंद राहील..
हिरालाल पाटील
तालुका अध्यक्ष
भाजपा तालुका अमळनेर