• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

ढेकू खुर्द गावाच्या विकासासाठी ग्रामविकास मंचाचे पदाधिकारी कटिबद्ध

Mar 26, 2024

Loading

ढेकू खुर्द गावाच्या विकासासाठी ग्रामविकास मंचाचे पदाधिकारी कटिबद्ध

होळी व रंगपंचमीचे औचित्य साधत गावात स्वच्छता पेटीचे वाटप

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
आपलं गाव गड्या कसंही असलं तरी लईचं भारी ! असे प्रत्येकालाच वाटतं असतं. मात्र, तेच गाव वास्तवात सुंदर बनविण्यासाठी धडपडणारे अगदीच हाताच्या बोटावर मोजणारी सापडतात. गावात विविध शासकीय योजनांबरोबर ग्रामस्वच्छता, सौरऊर्जा, वृक्षारोपण, जलसंधारण, तंटामुक्ती, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक उपक्रम,आदर्श शाळा या विविध स्तरावर काटेकोर नियोजन करून कृती आराखडा तयार करून ढेकू खुर्द ता.अमळनेर
या गावा आदर्श गाव निर्मितीच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. यासाठी ग्रामविकास मंचाचे पदाधिकारी कटिबद्ध झाले आहेत..
सविस्तर माहिती अशी कि अमळनेर ते जळगाव, अशा या महत्वाच्या मार्गावर वसलेले ढेकु खुर्द हे गाव . आपले गाव एक आदर्श व्हावे यासाठी गावातील तरुण मित्रांनी एकत्र येऊन ग्रामविकास मंच च्या माध्यमातून सा.मुतारी, बस स्टँड दुरूस्ती व रंगकाम स्वानिधितून केले. तसेच गाव स्वच्छ व सुंदर राहावे ह्या साठी, होळी व रंग पंचमीचे औचित्य साधून गावात स्वच्छता पेटीचे वाटप केले. ग्रामविकास मंच गावातील व सभोवतालील परिसर स्वच्छ , सुंदर व सुशोभित करण्यासाठी लोकसहभागातून ग्रामस्वछता अभियान राबविणार आहे. यासाठी सर्व ग्रामस्थांनी सदस्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्या देखील दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *