• Sun. Jun 15th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

जि.प.पिंगळवाडे शाळेचा विद्यार्थी झाला मुंबई पोलीस…पिंगळवाडे गावाच्या शिरपेचात वर्दीच्या रुपात तब्बल 2 तपानंतर मानाचा तुरा

Jun 25, 2024

Loading

जि.प.पिंगळवाडे शाळेचा विद्यार्थी झाला मुंबई पोलीस…

पिंगळवाडे गावाच्या शिरपेचात वर्दीच्या रुपात तब्बल 2 तपानंतर मानाचा तुरा

अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
दारिद्रय व बिकट परिस्थिचा सामना करत पिंगळवाडे येथील शेतमजूराचा मुलगा मनोज सपकाळे याने मेहनत व जिद्दीच्या जोरावर वर्दीचा राजमार्ग केला सुकर…
मुंबई पोलीस म्हणून निवड झालेल्या मनोजची गावात डिजे लावून मिरवणूक काढण्यात आली…
पिंगळवाडे येथील शेतमजूराचा मुलगा मनोज राकेश सपकाळे याने दारिद्रय व बिकट परिस्थितीशी दोन हात करत आई सुनिता सपकाळे वडील राकेश सपकाळे तसेच शिक्षणासाठी मदत करणारा मोठा भाऊ अजय सपकाळे यांच्या कष्टाचे चीज करुन आपले पोलीस होण्याचे स्वप्न सत्यात उतरवले आहे.
मनोजचे इ.1 ली ते 4 थी पर्यंतचे (प्राथमिक) शिक्षण पिंगळवाडे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले आहे. इ.5 वी ते 8 वी पर्यंत (उच्च प्राथमिक) शिक्षण मामाच्या गावी पारोळा तालुक्यातील अंबापिंप्री येथे त्यानंतर इ.9 वी व 10 वी निंभोरा येथील माध्यमिक शाळेत, इ. 11 वी व 12 वी पर्यंतचे शिक्षण अमळगाव येथील आदर्श हायस्कूल येथे पुर्ण केले आहे. तसेच पदवी व पदव्युत्तर शिक्षण एम.ए. (राज्यशास्त्र) प्रताप महाविद्यालय अमळनेर येथे पुर्ण करुन गावातील जि.प.शाळेत असलेल्या अभ्यासिकेत अतिशय मेहनत व चिकाटीने स्पर्धा परिक्षेची तयारी करत सोबत पोलिस भरतीसाठी ग्राऊंडची तयारी म्हणून अमळनेर तालुका क्रीडा संकुलच्या रनिंग ट्रॅक वर न चुकता सराव करुन मेहनत व जिद्दीच्या जोरावर मिळालेले यश 82 उमेदवारांच्या रद्द झालेल्या प्रतिक्षा यादीमुळे थोड्यासाठी हुकले होते. परंतू आपल्या मेहनतीवर पुर्ण विश्वास असलेल्या मनोजने पुढील भरतीसाठी प्रयत्न सुरुच ठेवले होते. त्यातच मुंबई पोलीस शिपाई (चालक) भरती 2021 च्या प्रतिक्षा यादीतील 82 उमेदवारांचा समावेश अंतिम निवड यादीत झाल्याने मनोज च्या मेहनतीला व जिद्दीला उशिरा का होईना पण फळ मिळाले.
आपल्या यशाचे श्रेय मनोज आपले कष्टकरी आई-वडील, भाऊ व मार्गदर्शक शिक्षक यांना देऊन निवड झाल्यानंतरही आपल्या उच्च शिक्षणाद्वारे स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु ठेऊन यापेक्षा मोठे पद मिळवण्याची इच्छा मनोजने व्यक्त केली आहे. मनोज च्या या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असून पिंगळवाडे गावच्या सरपंच मंगला देशमुख, उपसरपंच अतुल पाटील, निवृत्त प्रांताधिकारी भागवत सैंदाणे, माजी पोलिस पाटील तथा आजोबा नाना सपकाळे, आजी सुमनबाई हिरामण सपकाळे, काका भिमराव सपकाळे, दिनेश सपकाळे, जि.प.पिंगळवाडे शाळेचे शिक्षक दत्तात्रय सोनवणे, प्रविण पाटील, रविंद्र पाटील, वंदना ठेंग, वंदना सोनवणे, अभ्यासिकेतील सहाध्यायी विद्यार्थी अमोल पारधी, विपुल पाटील, संदीप पाटील, प्रमोद पारधी, विशाल सपकाळे, श्रीक्षेत्र पिंगळवाडे येथील ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed