राज्यातील सर्व शाळांमध्ये २२ ते २८ जुलै साजरा होणार शिक्षण सप्ताह…
गणेश हिरवे…मुंबई प्रतिनिधी…केंद्रीय शिक्षण मंत्रालय भारत सरकारच्या वतीने संपूर्ण भारतात शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून महाराष्ट्रात प्रामुख्याने हा सप्ताह दिनांक २२ ते २८ जुलै २०२४ रोजी साजरा करण्यात येणार असून बृहनमुंबई शिक्षण विभाग पश्चिम चे शिक्षण निरीक्षक सुनिल सावंत , उपनिरीक्षक अश्विनी लाठकर यांनी V,C.द्वारे पश्चिम विभाग झोन अंतर्गत येणाऱ्या वांद्रे ते दहिसर विभागातील शाळांनी याचे उत्साहाने नियोजन व अमंलबजावाणी करण्याचे आवाहन सर्व शाळांना केले आहे.उत्तम व दर्जेदार उपक्रम घेवून वातावरण निर्मिती व जनजागृती करावी. यात प्रामुख्याने पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने दिनांक २७ जुलै रोजी वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन आपल्या शाळेत किंवा जिथे जिथे वृक्षतोड झालीय अशा जागेवर करायचे आहे.एक पेड माँ के नाम याद्वारे वृक्ष जोपासना होईल. प्रत्येक शाळेने इको क्लब ची स्थापना करून त्यात विद्यार्थी आणि पालकांना समाविष्ट करायचे आहे.इतर दिवशीही अनेक उपक्रम शाळेत राबवायचे असून त्यात प्रामुख्याने संख्यज्ञान आणि साक्षरता दिवस, क्रीडा आणि सांस्कृतिक, कौशल्य व डिजिटल उपक्रम, समुदाय सहभग, अध्ययन अध्यापक दिवस आदी कार्यक्रम करायचे असून यात शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांनी सक्रिय सहभाग नोंदवायचा आहे. शिक्षण सप्ताह प्रत्येक शाळेने काटेकोर पद्धतीने राबविण्याचे आवाहन शिक्षण निरीक्षक धर्मेंद्र नाईक, शिक्षण निरीक्षक नीता वैदू, सहायक शिक्षण उपनिरीक्षक हेमलता गावित, गजेंद्र बनसोडे (सहाय्यक कार्यक्रम अधिकारी) यांनी केले आहे.