11 ऑगस्ट रविवार रोजी “बारावीनंतर यूपीएससी व एमपीएससी परीक्षांची तयारी” या विषयावर विनामूल्य सेमिनारचे आयोजन
दिल्ली येथील अर्थशास्त्र आणि सद्यघटना या विषयांच्या तज्ञ मार्गदर्शिका मोनिका सिंग यांचे ई-मार्गदर्शन
विद्यार्थ्यांनी संपर्क साधण्याचे आयोजकांचे आवाहन
अमळनेर प्रतिनिधी
इयत्ता बारावी उत्तीर्ण तसेच पदवीचे शिक्षण घेत असणाऱ्या युवक युवतींसाठी नोबेल फाउंडेशन संचलित यशवर्धिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे दिनांक 11 ऑगस्ट रविवार रोजी “बारावीनंतर यूपीएससी व एमपीएससी परीक्षांची तयारी” या विषयावर विनामूल्य सेमिनारचे आयोजन करण्यात आलेले आहे. या अंतर्गत जळगाव येथे प्रथमच दिल्ली येथील अर्थशास्त्र आणि सद्यघटना या विषयांच्या तज्ञ मार्गदर्शिका मोनिका सिंग यांचे ई-मार्गदर्शन लाभणार आहे. तसेच याप्रसंगी वित्त व लेखाधिकारी तसेच भगीरथ भूगोल या पुस्तक मालिकेचे लेखक कपिल पवार, दिल्ली येथील ज्येष्ठ विश्लेषक व पत्रकार प्रशांत शिरसाळे तसेच पुणे येथील युपीएससी मार्गदर्शक जयेश वानखेडे व नोबेल फाउंडेशनचे संचालक जयदीप पाटील मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राज्य कर निरीक्षक राहुल पाटील उपस्थित राहणार आहेत.
सदर सेमिनार अंतर्गत बारावीनंतर स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी,कोणती पुस्तके वाचावी,अभ्यास कसा सुरू करावा,स्पर्धा परीक्षांसाठी कोणत्या गोष्टी टाळाव्यात तसेच पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षेची अभ्यासाची पद्धत याबद्दल तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. सदर सेमिनार नोबेल फाउंडेशन प्रगती विद्यामंदिर समोर चैतन्य नगर येथे संपन्न होणार आहे. तरी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन समन्वयक विवेक साळुंखे पाटील यांनी केलेले आहे.