वंजारी महासंघाचे दुसरे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन : कालसापेक्ष साहित्य निर्मितीसाठी दमदार पाऊल-ज्येष्ठ साहित्यिक प्रा.वा. ना.आंधळे
जळगांव प्रतिनिधी :
महाराष्ट्रासह देशभरातील मराठी प्रज्ञावंतांकडून माय मराठीची अविरत साधना आणि सेवा घडत असून वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य या संस्थेने मराठी भाषा व साहित्य समृद्धीच्या दृष्टीने द्वितीय राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचे उचललेले धाडसी पाऊल अभिनंदनीय असल्याचे मत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी प्रा.वा. ना.आंधळे यांनी व्यक्त केले.प्रा.आंधळे हे वंजारी महासंघाच्या सन २०२२ मध्ये नाशिक येथे संपन्न झालेल्या पहिल्या राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी या भावना व्यक्त केल्या.यावेळी ते म्हणाले,साहित्यातून समाजमानाची स्पंदनं जपली जातात.साहित्य जर कालसापेक्ष असेल तर वर्तमानासह मानवी भविष्याला ते दिशादर्शक ठरतात.समाजहितैषी विचारांना व सृजनाविष्काराला दृढता यावी म्हणून छोटी मोठी सारीच साहित्य संमेलने ही गरजेची व आवश्यक असतात.नेमका हाच विचार वंजारी महासंघाने कृतिरुप करण्यासाठी दि.२५ ऑगस्ट २०२४ रविवार रोजी अहिल्यानगर येथे राष्ट्रसंत भगवान बाबा चौकातील गंगा लॉन्सच्या सभागृहात संमेलनाचे आयोजन केले असून समाज बंधू भगिनींनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहनही संमेलनाचे मावळते अध्यक्ष या नात्याने प्रा.आंधळेंनी केलेय.
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सदरचे द्वैवार्षिक राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक गणेशजी खाडे यांच्या अवाहनाला अहिल्यानगरकरांनी दिलेला प्रतिसाद निश्चितच उल्लेखनीय आहे.
सदर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नांदेड येथील सुप्रसिद्ध साहित्यिका प्रा.डॉ.संगीता गणपतराव घुगे तर उदघाटक म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य प्रा.डॉ.गजाननराव सानप यांना निमंत्रित करण्यात आले आहे.संमेलनास प्रमुख अतिथी म्हणून अहिल्यानगरचे पालक मंत्री मा. श्री.राधाकृष्ण विखे पाटील ,खासदार म.श्री.निलेशजी लंके,माजी खासदार म.श्री.सुजयजी विखे पाटील,आमदार मा. श्री.संग्राम भैय्या जगताप,शिर्डीचे खासदार मा. श्री.भाऊसाहेब वाकचौरे,माजी खासदार मा. श्री.सदाशिवराव लोखंडे,संगमनेरचे आमदार मा. श्री.बाळासाहेब थोरात,राहुरीचे आमदार मा. प्राजक्ता तनपुरे,शेवगाव पाथर्डीच्या आमदार मा. मोनिकाताई राजळे,जामखेड कर्जतचे आमदार मा. श्री.रोहितजी पवार,मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्राचार्य डॉ.नवनाथ आघाव,वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री.गणेशजी खाडे, नाशिक येथील उद्योगपती मा. श्री.बुधाजीराव पानसरे यांची उपस्थिती लाभणार आहे.
संमेलन यशस्वितेच्या दृष्टीने संमेलनाचे स्वागताध्यक्ष आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू राजकुमार आघाव,यांचेसह सह स्वागताध्यक्ष रेणुका वराडे,सह स्वागताध्यक्ष घनश्याम बोडके,निमंत्रक नगर जिल्हा अध्यक्ष वंजारी महासंघ मल्हारी खेडकर अथक प्रयत्न करीत आहेत.
हे संमेलन संस्मरणीय व ऐतिहासिक व्हावे यादृष्टीने स्थानिक व महाराष्ट्रातील साहित्य रसिक व समाज बंधू भगिनींपर्यंत निमंत्रण पाठविले जाणार असल्याचे वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य साहित्य आघाडीचे उपाध्यक्ष तथा राज्य संपर्क प्रमुख साहित्यिक मा. चंद्रकांत धस यांनी व्यक्त केले.