*स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयास मनपास्तरीय आंतर शालेय फुटबॉल स्पर्धेत १९ वर्षाखालील गटात दुहेरी मुकुट.*
*जळगाव: येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात नुकत्याच संपन्न झालेल्या मनपास्तरीय आंतर शालेय १९ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत के.सी.ई. सोसायटी संचलित स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाने मुले आणि मुली गटाचे विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटात झालेल्या अंतीम सामन्यात स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाने अण्णासाहेब डॉ.जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाचा ६-० ने दणदणीत पराभव करीत दिमाखात विजेतेपद पटकवले. तर मुलांच्या गटात झालेल्या अत्यंत चुरशीच्या अंतीम लढतीत स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाने ईकरा कॉलेजचा ३-२ ने पराभव करत विजेतेपद पटकवले.*
*मुलींमध्ये भाग्यश्री दुसाने, मुलांमध्ये कैवल्य खैरनार हे स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयाचे खेळाडू उत्कृष्ट खेळाडू ठरले. त्यांना ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले. विजेत्या खेळाडूंना क्रीडा शिक्षक डॉ.रणजीत पाटील यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.*
*स्पर्धेतील विजेत्या आणि उपविजेत्या संघातील खेळाडूंना सुवर्ण व रजत पदक देऊन गौरविण्यात आले. विजेत्या खेळाडूंचे संस्थाध्यक्ष प्रज्ञावंत श्री.नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य डॉ.एस.एन.भारंबे, उपप्राचार्य श्रीमती.करुणा सपकाळे, पर्यवेक्षक प्रा. आर.बी.ठाकरे, प्रा.स्वाती बऱ्हाटे (समन्वयिका विज्ञान शाखा),प्रा.उमेश पाटील (समन्वयक कला व वाणिज्य शाखा), प्रा.शिल्पा सरोदे, प्रा.महेंद्र राठोड, डॉ.अतुल इंगळे, प्रा.संदीप वानखेडे यांनी अभिनंदन केले आहे.*