• Tue. Jul 8th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

डोंबिवली भारत स्काऊट गाईडसंस्था व रोटरी क्लब तर्फे राष्ट्र प्रेमाच्या त्रिवेणी संगम.: रो.महेंद्र भोईर वृक्षदिंडी, तिरंगा रॅली व रक्षाबंधन कार्यक्रम प्रचंड उत्साहात संपन्न.

Aug 17, 2024

Loading

डोंबिवली भारत स्काऊट गाईडसंस्था व रोटरी क्लब तर्फे राष्ट्र प्रेमाच्या त्रिवेणी संगम.: रो.महेंद्र भोईर

वृक्षदिंडी, तिरंगा रॅली व रक्षाबंधन कार्यक्रम प्रचंड उत्साहात संपन्न.

ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)
दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी डोंबिवली भारत स्काऊट्स आणि गाईडस् स्थानिक संस्था आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षदिंडी, तिरंगा रॅली व रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमासाठी खालील प्रमुख पाहुणे व मान्यवर उपस्थित होते
श्री वर्गीस डॅनियल चेअरमन केरलीय समाजम
मा.श्री राजशेखरन नायर
जनरल सेक्रेटरी केरलिय समाजम, डोंबिवली. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभागाचे अध्यक्ष रो.महेंद्र भोईर, सेक्रेटरी रो.मोहनदास कामत ,
खजिनदार रोटरियन दिनेश खरोटे. श्री सुनील फळदेसाई, श्री मंगेश जडे
रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभागाचे इतर पदाधिकारी,श्री किरण लहाने
जिल्हा संघटक स्काऊट,डोंबिवली भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्थेचे अध्यक्ष अशोक जगताप ,
सचिव जगदीश उगले ,
खजिनदार राजू घुले , उपाध्यक्ष एकनाथ चौधरी, प्रमुख सल्लागार गोपाळ सुर्यवंशी, सुनिल भावसार , नरेंद्र राणे , प्रा.लक्ष्मण इंगळे,मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख, व आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ.मनिलाल शिंपी,श्रीमती अनिता मुलकी
मुख्याध्यापिका मॉडेल इंग्लिश स्कूल डोंबिवली ( माध्यमिक),
श्रीमती शयमा पिल्ले
मुख्याध्यापिका मॉडेल इंग्लिश स्कूल ( प्राथमिक), गोपाल सुर्यवंशी, चंद्रकांत खैरनार, सुनिल पाटील,श्री लवलेश मिश्रा सर, श्री जी वी गांगुर्डे,श्री तुषार मोरेसर
सौ अनुराधा द्विवेदी , सौ लीना शिंपी, सौ नूतन कुऱ्हाडे , सौ श्यामल जोशी , सौ सविता शेपाळ तसेच इतर शाळेतील स्काऊट मास्टर गाईड कॅप्टन उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात बँड पथकाद्वारे सलामी देऊन करण्यात आली .वृक्ष दिंडी व तिरंगा रॅली सकाळी 8 वाजता मॉडेल इंग्लिश स्कूल इथून गावदेवी मंदिर, मानपाडा रोड,आयकॉन हॉस्पिटल , गांधीनगर रोड , स्व.आनंद दिघे साहेब हॉल समोरून परत मॉडेल इंग्लिश स्कूल येथेच समारोप करण्यात आला. नंतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले .त्यानंतर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे, स्काऊट मास्टर, गाईड कॅप्टन सर्व विद्यार्थ्यांचे मॉडेल इंग्लिश स्कूल मध्ये स्वागत करण्यात आले .
त्यानंतर प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सरस्वती पूजन , स्काऊट गाईड चे जनक लॉर्ड बेडन पॉवेल व लेडी बेडेन पॉवेल यांचे प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला, व दीपप्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर डोंबिवली भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्थेतर्फे सर्व प्रमुख पाहुण्यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.स्थानिक संस्थेचे अध्यक्ष अशोक जगताप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.केरलिय समाजाचे चेअरमन श्री वर्गीस डॅनियल ,जनरल सेक्रेटरी राजशेखरन नायर यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले,त्यानंतर जिल्हा संघटक स्काऊट किरण लहाने यांनी आपले मनोगत व्यक्त केले, रोट्रियन अध्यक्ष श्री महेंद्र भोईर यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. माजी आमदार, ऑल इंडिया मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष, उदार आणि दानशूर व्यक्तिमत्व श्री जगन्नाथ आप्पा शिंदे यांनी डोंबिवली भारत स्काऊट गाईड स्थानिक संस्थेला लॅपटॉप व प्रोजेक्टर भेट दिला. त्याचे प्रमुख पाहुण्याच्या हस्ते हस्तांतरण करण्यात आले.त्यानंतर सर्व स्काऊट, गाईड यांना सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या “स्वप्नपूर्ती स्मरणिका ” PPT दाखविण्यात आली.त्यानंतर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे ,मान्यवर व स्काऊट यांना उपस्थित सर्व शाळांच्या गाईड यांनी राखी बांधली सर्व शाळेच्या गाईड यांनी स्काऊट यांना राखी बांधली व रक्षाबंधन कार्यक्रम अतिउत्साहात घेण्यात आला.या कार्यक्रमासाठी एकूण 17 शाळेच्या 340 स्काऊट ,गाईड व 30 स्काऊट मास्टर ,गाईड कॅप्टन यांनी सहभाग घेतला .तसेच मॉडेल इंग्लिश स्कूलच्या बँड पथकाच्या 45 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व कार्यक्रमाची शोभा वाढविली .उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना नाष्टा देण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमात मधून मधून श्री राणे सर यांनी स्काऊट टाळ्या घेऊन विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचलन एकनाथ चौधरी यांनी केले.
आभार .आपण नेहमी स्थानिक संस्थेला खूप सहकार्य असते. हे सर्व आपण सर्व पडद्या मागील हिरो आहेत.असेही यावेळी अशोक जगताप यांनी सांगितले.
डोंबिवली भारत स्काऊट गाईड गाईड स्थानिक संस्थेचे सचिव जगदीश उगले यांनी उपस्थित सर्व मान्यवर, स्काऊट गाईड मास्टर, स्काऊट गाईड विद्यार्थी यांचे विशेष आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed