मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून हजारो गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात मिळत आहे: डॉ.किशोर आमोदकर
परिवर्धे येथील के. डी गावीत प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप.
परिवर्धे,ता.शहादा (प्रतिनिधी)नंदूरबार जिल्ह्यातील परिवर्धे, तालुका शहादा येथील के.डी. गावीत प्राथमिक विद्यामंदिरात दि.16.08.2024 रोजी “मानव सेवा हीच खरी ईश्वरसेवा”ग्रुपचे प्रमूख, आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ.मनिलाल शिंपी यांचा संकल्पनेनुसार, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ यशवंत म्हात्रे, डॉ.किशोर अढळकर यांचा सहकार्याने परीवर्धे गावाचे भूषण महामहीम राज्यपाल यांचा हस्ते सन्मानित डॉक्टर किशोर आमोदकर यांचा उपस्थितीत ,श्री. रतिलाल रामदास शिंपी यांचा वाढदिवसाचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त, के. डी. गावीत कन्या विद्यालयात शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन वही पेन्सिल रबर शाॅपनर व पेन वाटप करण्यात आले.याप्रसंगी डॉ.किशोर आमोदकर यांनी सांगितले की विद्यार्थी जीवनात अभ्यासाचे व वाचनाचे महत्व पटवून दिले. मन एकाग्र करण्यासाठी खेळाची देखील आवड असणे गरजेचे आहे. तसेच. परिवर्धे येथील सुपुत्र आणि रस्ता सुरक्षा विभागाचे ठाणे, पालघर आणि नाशिक विभागाचे कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांचे सामाजिक कार्याचे वर्णन करणे शक्य नाही, महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, गरीब आणि गरजू लोकांना रेशन कपडे वाटप, असे अनेक उपक्रम मानवसेवा ग्रुप चा माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात समाजसेवा सुरू आहे.मनिलाल भाऊंचे कार्य खरोखर स्तुत्य आणि गौरवास्पद आहे.अश्या शब्दात डॉ. आमोदकर यांनी कौतुक केले.ज्येष्ठ समाजसेवक श्री. रतिलालसेठ शिंपी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी कु.वैष्णवी संजय शिंपी ही या शाळेची पहिली विद्यार्थिनी होती, आणि तिने एम एससी गणित विषय घेऊन प्रावीण्य मिळविले म्हणून मुख्याध्यापक विपुल नवले यांनी कु.वैष्णवी चा विशेष सत्कार केला. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत उपलब्ध व्हावी यासाठी मुख्याध्यापक श्री.विपुल नवले, यांच्यासह सहशिक्षिका सौ.छाया पाटील, आणि शीतल व सौ.मनिषा पाठक नेहमी प्रयत्नशील असतात, व विशेष परिश्रम घेत असतात.सौ.मनिषा पाठक यांनी उपस्थीत मान्यवरांचे आभार व्यक्त केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.