महाराष्ट्र राज्य मुंबई विभागातून
सब ज्युनियर राष्ट्रीय जम्परोप अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत गुरुनानक इंग्लिश स्कूलची भरारी.
ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)
महाराष्ट्र राज्य मुंबई विभागातून
*सब ज्युनियर राष्ट्रीय जम्परोप अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा डोंबिवली येथील ठाकूर हॉल, टंडन रोड, डोंबिवली (पुर्व) या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.
सब ज्युनियर गटाच्या खेळाडूंची राष्ट्रीय पातळीवर निवड चाचणी घेण्यात आली. यासाठी स्पर्धेत 110 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
राष्ट्रीय जम्परोप निवड चाचणी स्पर्धा ठाणे जिल्हा जम्परोप असोसिएशनच्या कार्यवाहक सौ.लता पाचपोर , अमन वर्मा, विदेश मोरे, शुभांगी देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली.
या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ डोंबिवली अपटाउन अध्यक्ष ललित नेमाडे व न्यू होप फाऊंडेशन चे अध्यक्ष रॉबर्ट डिसोझा हे उपस्थित होते. मुंबई विभाग व ईतर विभागातून निवडलेला संघ दिनांक 12 ते 14 सप्टेंबर 2024 ला नांदेड (महाराष्ट्र) या ठिकाणी राष्ट्रीय पातळीवर सहभागी होणार आहे. निवड झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन करण्यात येत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.