आर एस पी युनिट चा माध्यमातून प्रत्येक शाळेत विदयार्थी व पालकांमध्ये वाहतूक नियमांची अंमलबजावणी करणे सोपे-डीसीपी पंकज शिरसाट
आर एस पी अधिकारी युनिट तर्फे डीसीपी पंकज शिरसाट यांचे स्वागत.
ठाणे: कल्याण( प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटना नागपूर अंतर्गत, आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट ठाणे नवी मुंबई,पालघर विभागातर्फे नवनिर्वाचित ठाणे शहर वाहतूक पोलिस उपायुक्त श्री.पंकज शिरसाट साहेब यांची आज ठाणे जिल्हा आर एस पी अधिकारी युनिट तर्फे,ठाणे शहर वाहतूक उपायुक्त आदरणीय पंकज शिरसाठ साहेब यांची सदिच्छा भेट घेतली.यावेळी ठाणे, नवी मुंबई,विभागीय समादेशक श्री.दिलीप स्वामी,ठाणे, पालघर आणि नाशिक विभागाचे आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांनी पुष्पगुच्छ व पेन भेट देऊन स्वागत केले.याप्रसंगी पोलीस उपायुक्त शिरसाट साहेब यांना आरएस युनिट बद्दल अभिमान आणि कौतुक वाटले व मला आर एस पी शिक्षकांना भेटण्याची तीव्र इच्छा होती ती तुम्ही आज पूर्ण केली असेही आर एस पी युनिटच्या माध्यमातून प्रत्येक शाळेमध्ये वाहतूक पोलीस निरीक्षक वाहतूक एड्स कॉन्स्टेबल यांच्या सहकार्याने कार्यशाळा आयोजित करावी व त्यासाठी जी काही मदत लागेल ती आमच्या विभागाकडून आपणास पुरवली व ठाणे शहर आणि उपनगर मधील प्रत्येक शाळेमध्ये आर एस पी बालसैनिकांच्या माध्यमातून वाहतूक नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी व अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी विद्यार्थी व पालकांच्या सहकार्याने विविध उपक्रम राबवून जनजागृती करणे यासाठी आर एस पी बालसैनिक मेळाव्याचे देखील आयोजन करावे.तसेच श्री गणेशोत्सव, नवरात्र उत्सव आणि विशेष आपत्कालीन परिस्थिती आर एस पी वाहतूक विभागाचे निमित राहून कर्तव्य करावे . सर्व आर एस पी पदाधिकाऱ्यांचे पोलीस उपआयुक्त यांनी अभिनंदन केले. व प्रत्येक शाळेत आर एस पी पथक नोंदणी करून आपल्या विभागातील वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक, वाहतूक पोलिस,यांचा सहकार्याने कार्यशाळा घ्यावी, व वाहतुकीचा नियमांचे नियममित मार्गदर्शन करावे,माझे संपूर्ण सहकार्य राहील,असे उपायुक्त बोलताना डीसीपी शिरसाट साहेब यांनी सांगितले. विभागीय समादेशक दिलीप स्वामी यांनीही जास्तीत जास्त शाळांचा, व विद्यार्थ्यांच्या समावेश होईल असे सांगितले. ठाणे जिल्ह्यातील वाहतूक सुरक्षा व वाहतूक नियमांची जनजागृती करण्यासाठी विद्यार्थी बालसैनिक व पालकांचा सहभागाने पठनाट्य, व बालसैनिक विद्यार्थी पालकांच्या कार्यशाळा आयोजित करून अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी विशेष उपक्रम वाहतूक पोलीस विभागाचा मार्गदर्शनाखाली आर एस पी अधिकारी शिक्षक युनिट कायम तत्परतेने कार्य करण्यास तयार राहतील असे यावेळी पालघर नाशिक विभागाचे विभागीय समादेशक मनिलाल शिंपी यांनी सांगितले.यावेळी आर एस पी अधिकारी शिक्षक श्री.संजय खैरनार, ( कळवा, मुंब्रा ,समादेशक), श्री.बाळासाहेब साठे ( ठाणे शहर प,समादेशक),श्री.विनोद शेलकर( ठाणे जिल्हा उप समादेशक), श्री.मंगेश भामरे( भिवंडी,शहापूर , समादेशक) यांना प्रभारी समादेशक म्हणून वाहतूक पोलीस उपायुक्त श्री.पंकज शिरसाट यांचा हस्ते पत्र देऊन पदभार देण्यात आला. सर्व आर एस पी पदाधिकाऱ्यांचे पोलीस उपआयुक्त यांनी अभिनंदन केले. व प्रत्येक शाळेत आर एस पी पथक नोंदणी करून आपल्या विभागातील वाहतूक पोलीस निरीक्षक, psl यांचा सहकार्याने कार्यशाळा घ्यावी, व वाहतुकीचा नियमांचे नियममित मार्गदर्शन करावे,माझे संपूर्ण सहकार्य राहील,असे उपायुक्त यांनी सांगितले. आर एस पी अधिकारी शिक्षक विनोद शेलकर यांनी विशेष आभार व्यक्त केले.