आर. एस. पी. ठाणे जिल्हा उपसमादेशक पदी विनोद शेलकर यांची नियुक्ती.
कल्याण:ठाणे( मनिलाल शिंपी)- महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर संपूर्ण महाराष्ट्रभर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने वाहतूक निर्माण संदर्भात आणि नागरी संरक्षण संदर्भात जनजागृतीचे काम करत आहे. असेच काम पोलीस आयुक्तालय ठाणे यांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये आर. एस. पी. संघटन मोलाचे काम करत आहे. आता आर. एस. पी. संघटन शाळा शाळांपर्यंत पोहचत आहे. ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ट्रॅफिक सेन्स डेव्हलप होणे, वाहतुकीच्या नियमान संदर्भात जनजागृती करणे, विद्यार्थी नव्या समाजाचा नवा चेहरा आहे आणि तो वाहतुकीच्या संदर्भात सुसंस्कृत आणि जागृत असणे अत्यावश्यक आहे. जेणेकरून भविष्यातील रस्ते अपघात, ड्रिंक अँड ड्रॉइव्ह, वाहतुकीचे नियमांचे पालन करणारी जागृत पिढी घडवणे हा याचा मागील प्रामाणिक उद्देश आहे. ज्या माध्यमातून नागरी संरक्षण करण्यास मदत होईल. निश्चितच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांच्या घरापर्यंत तसेच सोसायटी पर्यंत ही जनजागृती पोहोचवण्यास मोलाचे सहकार्य लाभणार आहे. ही एक समाजसेवा आहे. शिक्षक हे विद्यार्थ्यांमध्ये वाहतुकीचे संस्कार रूजवण्यात सक्षम आहेत आणि यामुळे शिक्षक आणि शाळेच्या माध्यमातून ही मूल्य विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यासाठी पोलीस आयुक्तालय ठाणे मोलाचे काम करत आहे. प्रत्येक शाळेत आर. एस. पी. सुरू व्हावी असा पोलीस उपायुक्तलयाचा मानस आहे. प्रत्येक शाळेत आर. एस. पी. शिक्षकांचे प्रशिक्षण घेऊन आर. एस. पी. शिक्षक, त्याच प्रमाणे शाळा रजिस्ट्रेशन, विद्यार्थी रजिस्ट्रेशन करून आर. एस. पी. ची सुरुवात करता येते. हे संघटन जास्तीत जास्त शाळांपर्यंत पोहोचावे, विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, संघटनेचे काम जिल्हा निहाय सुरळीतपणे पार पडण्यासाठी प्रशिक्षित आर. एस. पी. शिक्षकांमधूनच कार्यतत्पर आर. एस. पी. शिक्षकांची जिल्हा, तालुका निहाय समादेशक पदी नियुक्ती महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर व पोलीस आयुक्तालय ठाणे यांच्या माध्यमातून केली जाते. नुकतेच नवनिर्वाचित ठाणे जिल्हा पोलीस उपायुक्त श्री पंकज शिरसाट, महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर अध्यक्ष संजय शेंडे, उपाध्यक्ष पितांबर महाजन, विभागीय समादेशक व आर.एस.पी. प्रशिक्षण प्रमुख दिलीप स्वामी, ठाणे पालघर आणि नाशिक विभागीय समादेशक डॉ.मनिलाल शिंपी यांच्या कडून आर. एस. पी. ठाणे जिल्हा उप समादेशक पदी विनोद शेलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय काम पाहून त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक सामाजिक संघटना आणि संस्थांच्या वतीने 75 हुन अधिक राष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय पुरस्काराने त्यांना आतापर्यंत सन्मानित करण्यात आलेले आहे. कल्याण मधील प्रथम थ्रीडी आर्टिस्ट म्हणून त्यांची आगळी वेगळी ओळख आहे. कल्याण तालुका कलाध्यापक संघाचे ते सचिव म्हणून काम पहात असतांना विद्यार्थ्यांसाठी कलात्मक वातावरण आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच कला शिक्षकांच्याही समस्या सोडवण्यासाठी आग्रही भूमिका शासनाकडे मांडत असतात. संत सावता माळी युवक संघ, भारत या संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून ते उत्तमरीत्या सामाजिक कार्य करत आहेत. एवढेच नव्हे तर आविष्कार एज्युकेशन फाउंडेशन या एन.जी.ओ.च्या माध्यमातून वंचित गरजवंत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य मदतीचा हात ते प्रत्येक वर्षी देत असतात. आविष्कार चे ते संस्थापक सचिव आहेत. प्रत्येक वर्षी दिवाळीनिमित्त आदिवासी लोकांची ही दिवाळी गोड व्हावी यासाठी फराळ व मिठाई वाटप करण्यात येते. विद्यार्थ्यांना आदिवासी बांधवांना कपडे वाटप करण्यात येते. हिवाळ्यामध्ये अंथरूण पांघरून या योजनेच्या माध्यमातून स्वेटर, ब्लॅंकेट्स आदिवासी आणि गरजवंतांपर्यंत पोहोचवले जातात. वंचितांना चित्रकलेचे साहित्य वाटप, विविध शाळा, सामाजिक संस्थांमध्ये मोफत करिअर मार्गदर्शन, एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा तसेच व्यक्तिमत्व विकास मार्गदर्शन ते करत असतात. गेल्या दहा वर्षांपासून प्रत्येक वर्षी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने जनजागृतीसाठी इको फ्रेंडली गणेशा मेकिंग कार्यशाळेचे आयोजन केले जाते. शैक्षणिक सामाजिक पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या समाजभान असलेल्या आदर्श व्यक्तिमत्त्वांचा सुद्धा पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. अविष्कार कला महोत्सव च्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी ते आजी-आजोबांपर्यंत चित्रकला आणि फेस पेंटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. चित्रकला विषयाच्या शासनाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या एलिमेंट्री आणि इंटरमिजिएट या परीक्षांसाठी मार्गदर्शक लेख त्यांनी लिहिले आहेत. असेच काम आर. एस. पी. मध्ये त्यांच्या माध्यमातून व्हावे या दृष्टीने त्यांची ही नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या या यशाबद्दल आर. एस. पी. अतिरिक्त ठाणे जिल्हा समादेशक जितेंद्र सोनवणे, कल्याण जिल्हा समादेशक अनंत किनगे, भिवंडी, शहापूर समादेशक मंगेश भामरे सर,संजय खैरनार, व गुरुनानक इंग्लिश हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका बलजीत कौर मारवाह, पर्यवेक्षिका अर्चना तिवारी, आर. एस. पी. ऑफिसर गोपाल राव डिकुल्ला, आविष्कार एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष – सचिन जाधव, खजिनदार – गिरीश मंजुळे, दलजीत बोन्स, प्रभाकर माळी, प्रणय काटे, व