आक्रमण करून संपत्ती लुटता येते पण ज्ञान नाही-ज्येष्ठ संपादक, प्रसिद्ध लेखक डॉ उदय निरगुडकर
मराठी वाड्:मय मंडळाच्या वतीने शारदीय व्याख्यानमालेत भारत काल आज आणि उद्या यावर व्याख्यान संपन्न..
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
विज्ञान संशोधनाच्या खंडित झालेल्या परंपरेला इंग्रजांच्या राजवटीत फारशी चालना मिळाली नाही. इंग्रजांनी निळीच्या संशोधनाला व्यापारी फायद्यासाठी चालना दिली. भारतातील संसाधनांचा वापर करून स्वतःच्या नावे वस्तुसंग्रहालये निर्माण केली; परंतु त्यात भारतीयांना योगदान करण्याची संधी नाकारली. पण भारताने आपल्या विद्वत्तेच्या जोरावर जगात आपली एक नवीन ओळख निर्माण केली आहे.. आक्रमण करून संपत्ती लुटता येते पण ज्ञान लुटता येत नाही असे अमळनेर येथे मराठी वांग्मय मंडळाच्या वतीने आयोजित शारदीय व्याख्यानमालेत छत्रपती शिवाजी महाराज नाट्य सभागृहात ज्येष्ठ विचारवंत,संपादक डॉ उदय निरगुडकर यांनी भारत काल,आज,आणि उदया यावर बोलतांना
सांगितले..
ते पुढे म्हणाले की अमळनेर शैक्षणिक, सांस्कृतीक केद्र असतांना अमळनेर तालुक्यात मागच्या पन्नास वर्षात तशी आयटीची उद्योजकता मला पाहायला मिळालेली नाही यांची खंत वाटते.. भारताची ही यशाची पताका अधिक सक्षमपणे पुढे चलावी असे वाटते पण
भारत स्वतंत्र झाला त्यावेळी भारतात अज्ञान, दारिद्रय, अस्थिरता, विषमता,अस्वच्छता आणि मागासलेपणा हे प्रश्न भेडसावत होते. या पार्श्वभूमीवर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे देशाचा विकास करणे हे मोठे आव्हान होते..
आशिया खंडातील जपान हा देश लहाण असूनही का मोठा?जपानमध्ये गेलो,व्यवस्थीतपणा हे त्याचे उदाहरण आहे, त्या देशातील नागरिकांना अभिमान आहे. देशासाठी त्याग करायचा हे तेथे दिसले..प्राचीन इतिहास असलेला हा देश औद्योगिकदृष्ट्या प्रगत असून जपानची अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर (अमेरिकेची संयुक्त संस्थाने व चीनच्या खालोखाल) आहे. येथील राहणीमानाचा दर्जा उच्च असून एका अंदाजानुसार जपानमधील लोकांचे आयुष्यमान जगात सर्वाधिक आहे. वयाची शंभरी म्हणजेच १०० वर्ष पार केलेले लक्षावधी लोकं जपानमध्ये आहेत.जपान असा देश आहे जिथे सर्वप्रथम सूर्याची किरणे पडतात. जपानला जपानी भाषेत ‘निहोन या निप्पॉन’ म्हटले जाते. याचा अर्थ उगवत्या सूर्याची भूमी. जपानला अनेक शतकांपासून मानवी संस्कृतीत सर्वोत्तम स्थान आहे. जपानने दुस-या महायुध्दाच्या वेळी चीनला हरवले होते. आजही या दोन्ही देशांमध्ये चांगलेसंबंध नाहीत..
पण भारतात भारत माता कि जय म्हणारा मूलगा जमीनीवर थुंकणार नाही याची खात्री देता येणार नाही.. पण आता भारतातही विकासाचा दर हा वाढलेला आहे ..येणाऱ्या काळात भारत हा महासत्ता होऊ शकतो हे जर लोकांनी ठरवले तर नेते ठरू शकत नाही असे सांगत ते पुढे म्हणाले की भारत हा तरुणांचा देश आहे..भारताने देशी बनावटीचे अग्निबाण आणि उपग्रह निर्मिती केली आहे. चंद्र आणि मंगळाच्या कक्षेत अवकाशयान पाठवले आहेत. उपग्रहांचा उपयोग संदेशवहन, हवामानाचा अंदाज, खनिज आणि भूजलाचा शोध, पिकांचे नियंत्रण आणि संरक्षणासाठी होत आहे. संरक्षक सामग्रीबरोबर क्षेपणास्त्रांची निर्मिती करून भारताने आपली संरक्षण व्यवस्था मजबूत केली आहे. कोरोनात लस तयार करण्यासाठी व इतर विज्ञानाच्या सर्व संशोधनामध्ये, महिलांचा मोठा सहभाग असतो या आपल्या देशासाठी अभिमानाची गोष्ट आहे.. देशात काम न करणारी माणसांना जनता डोक्यावर घेते.. काम करणारी माणसं अजूनही पुढे आली नाहीत याची खंत वाटते..
डॉ उदय निरगुडकर यांनी इंग्लंड अमेरिका व जगातील इतर देशांचा संबंध भारताचा तुलनात्मक अभ्यास करत येणाऱ्या काळात भारत सुद्धा एक महासत्ता होईल आताची पिढी ही स्मार्ट आहे आय टी क्षेत्रामध्ये लाखो कर्मचारी काम करत आहेत असे सांगितले.जेव्हा जनता खचते तेव्हा देश खचतो..भारतीयाची दसपट लूट झाली होती दरडोई उत्पन्न कमी झाले पण
1989 भारताला हिनवले पण ते म्हणाले विश्वगुरू देशात बनने आपल्या हातात आहे ते नेत्याकडे नाही..संशोधनाला प्रेरणा माना असे सांगितले..
मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर, प्रा.आप्पासाहेब र.का.केले सार्वजनिक ग्रंथालय व मोफत वाचनालय,अमळनेरतर्फे दि.3
ऑक्टोबरला शारदीय
व्याख्यानमालेत कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मंगळ ग्रह संस्थांनचे अध्यक्ष मा.डॉ. डिगंबर महाले तर व्यासपीठावर मराठी वाड्:मय मंडळाचे उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे, कार्यवाह नरेंद्र निकुंभ यांनी शारदीय व्याख्यानमालेचे उद्घाटन केले..
यावेळी डॉ डिगंबर महाले यांची
व्हाईस मिडीया चे प्रदेश चिटणीस निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार
मान्यवरांनी केला..कार्यक्रमाचे प्रस्ताविक मंडळाचे अध्यक्ष डॉ अविनाश जोशी यांनी केले..
त्यांनी सांगितले की मंडळाला साहित्य संमेलनाचा मान मिळाला यासाठी अमळनेरांचे आशिर्वाद आहेत..व्याख्यान मालेतून विचारांची देवाणघेवाण होते..यासाठी मंडळाचे पदाधिकारी नेहमीच सहकार्य करतात.. मंडळाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात अनेक कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस आहे..यावेळी देणगीदारांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ डिगंबर महाले म्हणाले की चांगल्या कर्माची फळे चांगले मिळतात.. अमळनेरच्या संस्कृतीला कायम जिवंत ठेवण्याचे काम जर कोणी केलं असेल तर ते मराठी वाड्:मय मंडळांनी केलेले आहे.. वेगवेगळ्या घरातून वेगवेगळ्या संस्कारातून वेगवेगळ्या शिक्षणातून आलेले लोक एकाच ठिकाणी वर्षानुवर्ष अतिशय चांगलं काम करतायेत..
त्यात संचालक मंडळाने क्लॅश ऑफ पर्सनॅलिटीच्या कुरबुरी ला येथील कणभर बाबीला यांनी कधी मणभर महत्त्व दिलेले नाही..वाद होणं हे जिवंतपणाच लक्षण आहे .तसेच एकमेकांना समजून घेणं हे समजतदारपणाचे लक्षण असते..
मराठी वांग्मय मंडळ ही संस्था आज 75 वर्षाच्या टप्प्यावर येऊन पोहोचलेली आहे सर दोन वर्षात आपण 75 वर्षे सादर करणार मंडळाचे प्लॅनिंग असेल.. एक मुख्य समस्या जी असते ती म्हणजे पैशाची .. चिंता करू नका अमळनेर तालुका दानशूर यांची भूमी आहे,
शेवटचं सांगतो सर ‘जिथे कमी, तिथे आम्ही’ त्याच्यामुळे तुमच्या सोबत काम करणं हे आम्ही आमचं भाग्य समजू जर मंगळ ग्रह सेवा संस्थेला मराठी वांड्:मय मंडळाच्या सोबत शहरात साहित्य सभा करण्याची संधी मिळाली तर तो निश्चितपणे आम्ही आमचा बहुमान समजू असे डॉ महाले यांनी सांगितले..
व्याख्यान मालीका यशस्वी करण्यासाठी मराठी वाङ्मय मंडळाचे
अध्यक्ष डॉ.अविनाश
जोशी, उपाध्यक्ष श्यामकांत भदाणे,
रमेश पवार, कार्यवाह नरेंद्र निकुंभ
सोमनाथ ब्रह्मे, शरद सोनवणे,
कोषाध्यक्ष प्रदीप साळवी, कार्यकारणी
सदस्य प्रा.डॉ.पी.बी.भराटे, बन्सीलाल
भागवत, स्नेहा एकतारे, संदीप
घोरपडे, वसुंधरा लांडगे, भैय्यासाहेब
मगर, प्रा.डॉ.सुरेश माहेश्वरी, प्रा.श्याम
पवार, प्रा.शीला पाटील, स्विकृत
सदस्य अजय केले, बजरंगलाल
अग्रवाल, ग्रंथपाल हेमंत बाळापूरे यांनी
केले आहे.
बहारदार सुत्रसंचालन मराठी वाड्:मय मंडळाचे संचालक प्रा.श्याम पवार,भैय्यासाहेब मगर यांनी केले तर आभार प्रर्दशन संचालक भैय्यासाहेब मगर यांनी मानले.