भिवंडी ग्रामीण भागात परतीच्या पावसामुळे भातपिकांचे मोठे नुकसान!
नुकसान ग्रस्त शेतीचे पंचनामे तात्काळ करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी- रामचंद्र देसले !
भिवंडी:कल्याण (मनिलाल शिंपी) भिवंडी तालुक्यात गेल्या आठ दिवसापासून परतीचा पाऊस विजांचा गडगडात व सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसलदारपणे बरसत आहे. त्यामुळे कापणी केलेली भात पिके पूर्णपणे मोड येऊन पुन्हा नवीन पिका मध्ये रूपांतर होताना दिसत आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांचे नुकसान होऊन शेतकरी अहवाल दिल झाले आहेत.हाता तोंडाशी आलेला घास पुन्हा हातातून जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे.त्यातच 110 दिवसाचे पीक फक्त 90 दिवसातच पूर्ण झाल्यामुळे शेतकऱ्यांना कापणी करावी लागली. सगळी कडे पाऊसच पाऊस वरुन राजा काही थांबत नाही यामुळे भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांच्या भात पिकाचे लवकरात लवकर पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी दैनिक स्वराज्य तोरण च्या माध्यमातून भोकरी गावचे समाजसेवक डॉ.श्री. रामचंद्र शांताराम देसले यांनी तहसीलदार व प्रशासनाला केली आहे. प्रशासन जरी आता निवडणुकीच्या कामात व्यस्त असले तरी शेतकरी देखील प्रशासनाचा एक भाग आहे,मतदार राजा आहे, हे विसरता कामा नये….