डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षांच्या आडमुठेपणामुळे कर्मचाऱ्यांचे दिवाळी पगारविना.
ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी)
व्यवस्थापनाचा आडमुठेपणा डोंबिवलीतील पेंढारकर महाविद्यालय कर्मचाऱ्यांची दिवाळी पगाराविना*
डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षांच्या, महाविद्यालय खाजगी करण्याच्या आडमुठेपणामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामापासून वंचित केलेले आहे.महाविद्यालय खाजगी करण्याचा व्यवस्थापनाचा निर्णय बेकायदेशीर आहे असे शासनाच्या अधिकाऱ्यांनी कळविले असता मंडळाने मा.उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.ज्यावर अद्याप कोणताही आदेश पारित झालेला नाही.
असे असताना मुंबई विद्यापीठाने पत्र दिलेले असताना देखील व्यवस्थापनाने अनुदानीत विभागातून प्राचार्यांची नेमणूक न केल्याने माहे सप्टेंबर व ऑक्टोंबर अशा दोन महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना वेतन मिळालेले नाही.सरकार कडून वेतन अनुदान प्राप्त झालेले असताना देखील ते वितरित करण्यासाठी नियमित प्राचार्य उपलब्ध नसल्याने वेतन मिळू शकलेले नाही.दिवाळी सारख्या सणाच्या काळात कर्मचाऱ्यांना वेतन न मिळू देण्याचा व्यवस्थापनाचा निर्णय अतिशय निषेधार्ह आहे. माजी प्राचार्यांना सही करण्याचे लेखी आदेश देवून किंवा बँक खात्यात सही करण्याचे अधिकार दुसऱ्या कुणालातरी देवून वेतन देणे व्यवस्थापनाला सहज शक्य असतांना केवळ कर्मचाऱ्यांना आर्थिक आणि मानसिक छळ करण्याच्या उद्देशाने व्यवस्थापन निर्णय घेत नाही.गेल्या पाच दिवसांपासून वेतन अनुदान व्यवस्थापनाच्या बँक खात्यात पडून असून त्याचे वितरण न करता कर्मचाऱ्यांना वेठीस धरले जात आहे.याची शासन दरबारी कुणी दखल घेईल की नाही असा प्रश्न कर्मचारी विचारात आहेत.