*आर एस पी शिक्षक संतोष हंडाळ यांच्या वाढदिवसानिमित्त पारस बालभवन मध्ये ब्लॅंकेट व मिष्टान्न भोजन वाटप.*
*मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे समाजकार्य उल्लेखनीय आहे: संगिता गुंजाळ*
ठाणे: कल्याण( मनिलाल शिंपी)मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून, आर एस पी अधिकारी युनिट कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांचा संकल्पनेनुसार दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ किशोर बळीराम पाटील,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ यशवंत म्हात्रे, स्वामीनारायण हॉल चे संचालक डॉ.दिनेशभाई ठक्कर,यांचा सहकार्याने
टिटवाळा परिसरातील म्हसकल येथील पारस बालभवन अनाथ आश्रमात श्री.संतोष हंडाळ यांचा वाढदिवसानिमित्त चिमुकल्यांना ब्लँकेट,बिस्किट्स, कुरकुरे,फराळ, व मिष्ठान्न वाटप करून खऱ्या अर्थाने जीवनाचा आनंद व्यक्त केला.यावेळी मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख मनिलाल शिंपी यांनी चिमुकल्यांसोबत पिकनिक चे गाणे बोलत नाचण्याचा आनंद घेतला. श्री. संदीप पाटील, श्री.राजू भागडे श्री सदाशिव मदने, श्री. बाळू काठे मेजर,श्री बाळासाहेब दवमुंडे, श्री संपत खेताडे, श्री.शंकर साबळे श्री.भिवा चोरमले, वेळात वेळ काढून उपस्थित होते.या उपस्थित सर्व मान्यवरांनी या निरागस आणि गोंडस चिमुकल्यांना सहृदयी ठेवत मदत करण्याचा मानस व्यक्त केला.पारस बालभवन चा संचालिका सौ.संगीताताई गुंजाळ यांनी शिंपी साहेब यांना पाहताच आमचा चिमुकल्यांना खूप आनंद होतो.मानवसेवेचा वसा घेऊन शिंपी सर खऱ्या अर्थानं पोस्टमन ची भूमिका घेत सर्वाचा मनात मानव सेवेचे महत्व निर्माण करीत आहेत.आज श्री.संतोष हंडाळ यांचा वाढदिवसाचे औचित्य साधून थंडीची तीव्रता अधिक आहे याची जाणीव ठेवत चिमुकल्यांना ब्लँकेट दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करत शुभेच्छा दिल्या. शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.