३५ वा रस्ता सुरक्षा अभियान निमित्त कल्याण पूर्व शाळेत वाहतूक नियमन विषयावर कार्यशाळा संपन्न
ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)
पोलिस आयुक्तालय ठाणे शहर वाहतूक नियंत्रण विभाग,ठाणे ,उपविभाग कोळसेवाडी, परिवहन विभाग कल्याण व महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा दल व नागरी संरक्षण संघटन नागपूर अंतर्गत ( आर एस पी) युनिट चा माध्यमातून,35 रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत छत्रपती शिक्षण मंडळाचे ज्ञानमंदिर हायस्कूल कल्याण पूर्व येथे, कोळसेवाडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांचा मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस उपनिरीक्षक श्री.जगन्नाथ उकले,परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक श्री.सुरजित सिंग चौहान,वाहतूक पो.हे. कॉ.श्याम ढाकणे मेजर, आर एस पी अधिकारी युनिट चे ठाणे पालघर आणि नाशिक विभागाचे विभागीय समादेशक श्री. मनिलाल शिंपी,कल्याण डोंबिवली विभागीय आर एस पी समादेशक, मुख्याध्यापक श्री.महादेव क्षिरसागर, कल्याण डोंबिवली आर एस पी अधिकारी समादेशक श्री.अनंत किनगे, आर एस पी अधिकारी श्री.बन्सीलाल महाजन, व सेफ्टी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष श्री.विशाल शेटे यांचा उपस्थितीत सरस्वती पूजन,दीपप्रज्वलन करून 35 वा रस्ता सुरक्षा अभियान 2025 अंतर्गत अपघात रोखण्यासाठी समाजामध्ये जनजागृती व्हावी यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
आर एस पी अधिकारी श्री.बन्सीलाल महाजन यांनी प्रास्ताविक केले.मोटार वाहन निरीक्षक श्री सुरजित सिंग चव्हाण यांनी वाहतूक नियम पाळून अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.तसेच कोळसेवाडी वाहतूक शाखेचे पोलिस उपनिरीक्षक श्री. जगन्नाथ उकले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,बाईक चालवताना हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. कार चालवताना सीटबेल्ट लावावा, व गाडी चालवताना मोबाईल वर बोलू नये त्यामुळे आपला अपघात होऊन प्राण गमवू शकतो.तरी सर विद्यार्थ्यांनी आपल्या परिसरात वाहतुकीचा नियमांची जनहमजगृती करावी असे आवाहन केले.वाहतूक पोलीस हे. कॉ.श्याम ढाकणे मेजर यांनीही रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यामागचा शासनाचा हेतू काय याबाबत माहिती दिली.सेफ्टी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष श्री विशाल शेटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लहान मुलांनी विनापरवाना गाडी चालवली तर आपल्या पालकांना काय कायद्याचा त्रास होऊ शकतो.त्यामुळे कोणत्याही लहान मुलांनी वयाचे 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत कोणतेही वाहन चालवू नये असे सांगितले.कल्याण डोंबिवली आर एस पी समादेशक श्री.अनंत किनगे यांनी रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत आर एस पी विषयाचा अभ्यास,आणि रस्ता सुरक्षा यावर आधारित नियमांचे ऑनलाईन पी पी. टी चा सहाय्याने ,सडक सुरक्षा जीवन रक्षा,यानुसार विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ.सुलक्षणा पाटील यांनी केले. रस्ता सुरक्षा कार्यशाळा एसएससी होण्यासाठी श्री. शिवदास चौरे सर,श्री.सुधीर वंजारे ,श्रीमती. मीनाक्षी शिर्के यांनी विशेष परिश्रम घेतले.मुख्याध्यापक महादेव क्षिरसागर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.