• Tue. Jul 8th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

धनदाई महाविद्यालयात मिनी गोल्फ स्पर्धेचे यशस्वी आयोजन*

Apr 8, 2025

Loading

*धनदाई महाविद्यालयात मिनी गोल्फ स्पर्धेचे यशस्वी आयोजन*

 

अमळनेर: येथील धनदाई कला व विज्ञान कला महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एरंडोल विभागीय आंतर महाविद्यालयीन मिनी गोल्फ स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन धनदाई माता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नानासाहेब डी डी पाटील यांच्या हस्ते झाले याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. लिलाधर पाटील, उपप्राचार्य डॉ. राहुल इंगळे एरंडोल विभागाचे क्रीडा सचिव प्रा. किशोर वाघ आदी मान्यवर उपस्थित होते
गोल्फ या खेळासाठी मोठ्या मैदानाची व संसाधनांची गरज असते. परंतु याच कला प्रकारातील मिनी गोल्फ या खेळाद्वारे या खेळाची नियमावली समजून घेऊन विद्यापीठ क्षेत्रातील इच्छुक खेळाडूंना प्रतिनिधित्व करण्याची संधी देखील प्राप्त होते. एरंडोल विभागीय अंतर महाविद्यालयीन स्पर्धेत 8 महाविद्यालयाच्या खेळाडूंनी सहभाग घेतला यात मुलांच्याआणि मुलींच्या अशा दोन्ही गटात बांभोरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा संघ विजेता तर धनदाई महाविद्यालयाचा संघ उपविजेता ठरला.
या स्पर्धेच्या नियोजनासाठी महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. शैलेश पाटील यांनी तर स्पर्धेच्या यशस्वितेसाठी प्रा डॉ महादेव तोंडे, प्रा डॉ संजय भावसार, ,प्रा डॉ देवदत पाटील, प्रा डॉ हर्ष सरदार, प्रा डॉ विजय पाटील, प्रा शिरसाठ, प्रा. प्रितेश तुरंणकर यांनी विशेष प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed