श्री मंगळग्रह मंदिरात श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा
अमळनेर प्रतिनिधी :
येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात श्रीराम नवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात व जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी अमळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्याहस्ते विधिवत पूजा करण्यात आली.
श्रीराम नवमीनिमित्त मंदिर परिसरात आकर्षक सजावटीने चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. प्रतिकात्मक स्वरूपात बाल श्रीरामाचे पूजन करुन पाना- फुलांनी सजवलेला पाळणा पो.नि. दत्तात्रय निकम यांनी दोरीने हलविला. गणेश पूजन, पुण्याहवाचन, श्रीराम प्रतिमा अभिषेक करुन जन्मोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी उपस्थित भाविकांनी प्रभू श्रीरामाचा जोरदार जयघोष करत प्रभु श्रीरामचंद्राची आरती व पाळणा गीत म्हटले. यावेळी मंगळग्रह सेवा संस्थेचे सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव यांच्यासह पो.ह. मिलिंद सोनार, पोकॉ. अमोल पाटील, पोकॉ. विनोद संदानशिव, पोकॉ. जितेंद्र निकुंबे, पोकॉ. सुनील पाटील, अनेक भाविक व सेवेकरी उपस्थित होत्ो. या कार्यक्रमाचे पौरोहित्य जयेंद्र वैद्य, वैभव लोकाक्षी, मेहुल कुलकर्णी, अक्षय जोशी यांनी केले. कार्यक्रमासाठी गोपाल पाठक व मंगल सेवेकऱ्यांचे सहकार्य लाभले.