पत्रकार स्वप्निल देशमुख यांचेवर प्राणघातक हल्ला
लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून त्वरीत कारवाईची मागणी.
हल्लेखोरांवर तामगांव पोलिसांत गुन्हे दाखल
वानखेड- शेतावरील पाणी अडवल्याच्या प्रकरणावरून वानखेड येथील युवा पत्रकार स्वप्निल उर्फ माधव देशमुख यांचेवर शेताचे शेजारी दादाराव देशमुख व त्यांचा मुलगा किशोर देशमुख यांनी दगड मारून व कुऱ्हाडीच्या वार करण्याचा प्रयत्न करून प्राणघातक हल्ला केला.कुऱ्हाडीचा वार चुकल्याने फेकून मारलेल्या दगडाने स्वप्निल देशमुख यांचे डोक्याला मार लागला असून रक्तस्त्राव झाल्याने त्यांना प्रथम वरवट बकाल प्राथमिक स्वास्थ केंद्रात व त्यानंतर शेगांव येथील सईबाई मोटे रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. स्वप्निल देशमुख यांचे वडील अशोकराव देशमुख यांचे तक्रारीनुसार याप्रकरणी तामगाव पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपी पिता- पूत्रांवर गुन्ह्यांची नोंद झाल्याचे समजते.
श्री दादाराव व स्वप्निल देशमुख हे दोघे शेताचे शेजारी आहेत.स्वप्निल देशमुख यांचे भाग १मधील गट क्र.७९ मध्ये १० एकर १३ गुंठे शेती आहे.पावसाळ्यात शेतातून जाणारा पाण्याचा प्रवाह दादाराव व मुलगा किशोर देशमुख यांनी दगड माती टाकून अडकल्याने ते पाणी स्वप्निल देशमुख यांचे शेतात साचून पिकांचे नुकसान झाले होते.ते अडवू नका म्हणून समजूत घातल्यानंतरही त्यांनी न ऐकल्याने या धुऱ्याच्या वादावरून स्वप्निल देशमुख व त्यांचे वडील अशोकराव देशमुख यांनी तहसिल कार्यालय संग्रामपूर येथे याबाबत दि.०५ मार्च २०२५ रोजी तक्रार केलेली आहे.या तक्रारीवरून राग व्यक्त करीत स्वप्निल देशमुख हे शेतात असतांना दादाराव देशमुख यांनी प्रथम त्यांना शिवीगाळ केली व मारहाण करून दगड फेकून मारला तो त्यांचे डोक्याला लागून मोठी जखम झाली.त्यानंतर त्यांनी कुऱ्हाडीचा वार करण्याचा प्रयत्न केला परंतू तो चुकवला गेल्याने झाडाला लागला. एवढ्यावरच न थांबता दादाराव व किशोर देशमुख यांनी त्यांना शेतातल्या विहीरीत टाकून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप स्वप्निल देशमुख यांचे वडील अशोकराव देशमुख यांनी सादर केलेल्या तक्रारीतून केला आहे.
अशोकराव देशमुख यांनी तामगाव पोलिस स्टेशनाला तक्रार दिली असून आरोपींवर त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून निषेध करण्यात आला असून त्वरीत कारवाईची मागणी करण्यात आली आहे.