|| श्रीराम जय राम जय जय राम ||
|| श्रीरामजन्मोत्सव ||
*रामनवमी निमित्त नीलम गोर्हे यांच्या निवासस्थानी विशेष पूजा आणि श्री राम आरती संपन्न*
जय श्रीराम
रामनवमीच्या पावन निमित्ताने
श्री रामप्रभूंच्या चरणी
पंचोपचार पूजा व आरती
यांचे आयोजन करण्यात आले होते. बंगल्याच्या परिसरात श्रीराम दरबार व अयोध्या येथील श्री रामलल्लांच्या मंदिराची प्रतिकृती तयार करण्यात आली होती.
आरतीच्या अगोदर श्रीराम पंचायतन याची पंचोपचार पुजा श्री विश्वास सिन्नरकर गुरूजी व हरी जोशी, अजित देशमुख,आदित्य दलाल गुरूजींच्या चमुने सामुहिक आरती केली.
श्री राम आरतीतील
*जयदेव जयदेव निजबोधा रामा , परमार्थे आरती, सद्भावे आरती परिपूर्ण कामा*
पंदांनी परिसर दणाणून गेला होता,
यानंतर *डॅा.नीलमताई गोर्हे यांनी समाजाला व जनतेला शुभेच्छा दिल्या.जनतेला श्री रामप्रभु्ंची निश्चयशक्ती, धाडस , सत्यप्रियता, लक्ष्मणाचे बंधुप्रेम, समयसुचकता,सीतामाईंची जिद्द व वीरत्व जनतेला प्राप्त व्हावे ही शुभेच्छा डॅा.नीलम गोर्हेंनी दिलीं.
सुदर्शना त्रिगुणाईत, कांता पांढरे, धनंजय जाधव, अक्षता धुमाळ,बाळासाहेब मालुसरे, नितीन पवार, आनंद गोयल, शिवसेना पदाधिकारी, संदिप काळे, भाजपा पदाधिकारी , निसर्गोपचार आश्रमांचे नरेंद्र हेगडे, मॅाडेल काॅलनी सुधारणा समितीचे, श्री.मिलींद केळकर ,ऊद्योजिका स्वाती देवळे , सलील नंदी व रिटा नंदी, आदि अनेक मान्यवरांचा
रविवार, दि. ६ एप्रिल २०२५ संध्याकाळी
सिल्वर रॉक्स – हरे कृष्ण मंदिर पथ, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर, पुणे येथील कार्यक्रमात सहभागी होते.
डॉ.नीलमताई गोऱ्हे
उपसभापती – विधान परिषद, शिवसेना नेत्या,
मानद अध्यक्ष – स्त्री आधार केंद्र, पुणे व श्रीम. जेहलम जोशी,
विश्वस्त – स्त्री आधार केंद्र, पुणे यांच्या हस्ते आरती संपन्न झाली.