डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सुनिता मोरे सन्मानित.
अमळनेर: येथील सौ. सुनिता हृदयनाथ मोरे यांना जळगाव येथील ‘ सार्थक सिद्ध सेवा फाउंडेशन ‘ च्या वतीने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींना दिला जाणारा प्रतिष्ठेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 हा सुनिता मोरे यांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेऊन, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते जळगाव येथे समारंभ पूर्वक प्रदान करण्यात आला.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष रमेश मकासरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. रिपाई चे पूर्व जिल्हाध्यक्ष भगवानभाई सोनवणे, जिल्हाध्यक्ष पश्चिम आनंद खरात, जळगाव महानगर अध्यक्ष अनिल अडकमोल, सार्थक सिद्ध सेवा फाउंडेशन च्या अध्यक्षा लक्ष्मी कुमावत सोनवणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.